





येडशी येथे ईद ऊल अज्हा ची नमाज ; बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 17 जून 2024
β⇔येडशी, दि.17 (प्रतिनिधी : सुभान शेख,):-आज मुस्लीम बांधांवाचा बकरी ईद सण धाराशिव पोलिस ठाणेचे पोलिस अधीक्षक – अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक – मारुती शेळके यांनी येडशी येथे सोलापुर ते छत्रपती संभाजी नगर जुने रोड लगत असलेले इदगाह मैदानावर दि.१७ जुन सोमवार रोजी ईद ऊल अज्हा ची नमाज पठण करण्यासाठी चोख सर्वत्र बंदोबस्त करण्यात आला होता.
यावेळी मुस्लीम बांधांव बकरी ईद सण पठण करत असताना जामा मस्जिदचे मौल्लवी – अमजद पटेल यांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आली. नमाज पठण झाल्या नंतर धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक – मारुती शेळके यांना शुभेच्छा देऊन, गळा भेट घेवून ईद ऊल अज्हाची शुभेच्छा देत सर्व पोलिस प्रशासनाचे आभार मानुन शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक – मारुती शेळके, मौल्लवी – अमजद पटेल, कमिटी चे सदस्य – सल्लाऊद्दिन शेख, लतिफ शेख, महंमद पटेल, अशफाक पटेल व तसेच, गावातील नागरिक – शमशुद्दीन याकुब पटेल, दस्तगीर शेख, हैदर अली पटेल, उस्मान पटेल, सुभान शेख, गुलाब सय्यद, आदि सर्व मुस्लिम बांधव आणि हेडकॉन्स्टीबल – गंगाधर मुळखेडे, केंद्रे उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)