येडशीत रस्त्यावर खडी पसरल्याने, दुचाकी स्वारांचा जीव धोक्यात ! ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार
![β : येडशी :⇔ येडशीत रस्त्यावर खडी पसरल्याने दोन चाकीचा जीव धोक्यात , ग्रामपंचायतीचे मनमानी कारभार-(प्रतिनिधी : सुभान शेख)](https://divyabharatbsmnews.com/storage/2024/04/फोटो-१-येडशी-बोली-300x225.jpeg)
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.29 मार्च 2024
β⇔येडशी– दि.29(प्रतिनिधी : सुभान शेख)- उस्मानाबाद – धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मागील वर्षे 2023 मध्ये ग्रामपंचायतीचे निवडणूका झाल्या आहेत. या निवडणुका मध्ये येडशी गावचे महिला सरपंच – डॉ.सोनिया प्रशांत पवार तर , उपसरपंच – प्रिया शशांक सस्ते आहेत. तर ग्रामविकास अधिकारी – येडशी गावचे स्थायिक आहेत. येडशी ग्रामपंचायतीचा मुख्य कारभार ग्रामविकास अधिकारी व सरपंच या दोघांवर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो.
या ग्रामपंचायतीने प्रभाग क्रमांक ५ मधील सुभाष नगर परिसरातील मुख्य प्रभात फेरीचा रस्त्यावरील सिंमिंट कांक्रेट रस्त्याचे काम करण्यासाठी मुख्य रस्त्यावरील मटेरिअल आणुन टाकले आहे. परंतु या मटेरिअलचे सिंमिंट काँक्रिट रस्त्याचे काम गल्ली बोळातील रस्त्याचे काम उपसरपंच यांनी हातावर काम घेतले. परंतु या रस्त्याचे काम उपसरपंच यांनी पूर्ण केले आहे. हे काम पंधरा दिवस पुर्ण झाले आहे. तरीही या उपसरपंचांनी रस्त्यावर पसरुन पडलेले खडी उचलण्याचे काम केले नाही. या खडीवरुन ये – जा करण्यासाठी दोन चाकीना हातामध्ये जीव मुठीत धरून रस्त्यावरुन कसरत करावी लागत आहे.
ही रस्त्यावरील खडी पसरल्याने येडशी प्रतिनिधीने यांनी या पसरल्या खडीकडे दखल घेतली. ही दखल घेताच येडशी प्रतिनिधीने गावातील ग्रामपंचायत उपसरपंच – प्रिया शशांक सस्ते यांचे पती शशांक सस्ते यांना सतत सलग दोन दिवस फोन केले. परंतु , शशांक सस्ते म्हणाले की , वाहन काही मिळेना वाहन मिळाले की, खडी उचलण्याचे नियोजन करतो.असे ते सांगितले, परंतु या चालु आठवड्यात ग्रामपंचायतला लगातार तीन सुट्टया आले असून चौथ्या दिवशी सोमवार आला आहे. मग रस्त्यावर खडी पसरलेले उचलण्याचे काम पूर्ण कधी होणार ? या कडे महिला , वृद्ध नागरिक, दोन चाकीचा लक्ष लागले आहे. रस्त्यावरील खडी पसरलेल्या त्याच्या पुढे शिवाजी नाईकवाडी यांच्या घरासमोर दुषित पाणी साचले आहे. तसेच मुख्य रस्त्यावरील खडीचे ढीग पडले आहे. या वाहन धारकांना ये – जा करण्यासाठी वाट शिल्लक नाही. तरी येडशी गावचे महिला सरपंच पती डॉ.प्रशांत हरिश्चंद्र पवार यांनी स्वतःहून लक्ष घालून , नाईकवाडी यांच्या घरासमोरील साचलेले खडीचे ढीग बांधकाम मालकाला उचलण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी ग्रामस्थांनातुन होत आहे.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510