Breaking
ब्रेकिंग

β⇒निफाड : सायखेडा विद्यालयाच्या खेळाडूंची ऑरगोमिटर स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )

सायखेडा विद्यालयाच्या खेळाडूंची ऑरगोमिटर स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड ..

0 0 2 5 6 1

सायखेडा विद्यालयाच्या खेळाडूंची ऑरगोमिटर स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज  : सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम

β⇒ सायखेडा ता.४ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ): – मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथील विद्यार्थ्यांनी पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ऑरगोमिटर स्पर्धेत कुमार जनार्दन जाधव ,आदित्य निलेश खेलुकर, वेदांत खालकर ,कुमारी संस्कृती बुचूडे व श्रेया पोटे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . राज्यपातळीवरील झालेल्या ऑरगोमिटर स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी कुमारी संस्कृती बुचूडे व श्रेया पोटे या विद्यार्थिनींची निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा 14 ऑगस्ट ते 19ऑगस्ट या कालावधीत पुणे येथे संपन्न होत आहे. त्यांना विशेष मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा . श्री.धोंडगे, श्री माणिक गिते, अरूण दराडे, हेमंत काळे यांचे लाभले . त्यांच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. श्री सुनील ढिकले, उपाध्यक्ष श्री विश्वास मोरे ,सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती श्री देवराम मोगल, चिटणीस श्री दिलीप दळवी ,निफाड तालुका संचालक श्री शिवाजी गडाख, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज, शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय कारे, अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष श्री जगन्नाथ डेरले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष जगन्नाथ आप्पा कुटे, मविप्रचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ. भास्कर ढोके , शिक्षणाधिकारी तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी डी लोखंडे ,प्राचार्य श्री नवनाथ निकम, पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी त्यांचे कौतुक केले.

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज  : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले ,मो . ८२०८१८०५५१० 

उंबरठाण वन अधिका-याच्या पथकाची कारवाई,खैर तस्करांच्या टोळीला लगाम  
मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५५१० 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 1

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!