स्व. पार्वतीबाई रायरीकर स्मृति पुरस्कर वितरण सोहळा उत्साहात संपन्न....
दिव्य भारत बी.एस.एम. न्यूज : प्रतिनिधी नाशिक रोड– संजय परमसागर
नाशिकरोड ,ता .२९ (दिव्य भारत बी.एस.एम. न्यूज) :- ” स्व. पार्वतीबाई रायरीकर पुरस्कार वितरणाचा हे ११ वे वर्ष असून स्व. प्राचार्य डॉ. ह. या. रायरीकर व सौ. प्रतिभा रायरीकर यांच्या उदार देणगीतून दरवर्षी इ. १ वी ते इ. १० वी वर्गातील प्रत्येक तुकड्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास आर्थिक मदत देऊन सन्मानित करण्यात येते. या पारितोषिकांतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन,प्रेरणा व शाबासकी मुळे यापुढेही जोमाने प्रगती होते. रायरीकर यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून नाशिकरोड केंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्थेच्या उज्वल वाटचाली व भरभराटी मध्ये मोलाची भर दरवर्षी घालत आहेत, यापुढेही ध्येय ठरवून योग्य शिक्षण घ्या ,” असे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी केले .
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतन येथे बुधवार दि. २८ जून रोजी स्व. पार्वती बाई रायरीकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते . याप्रसंगी व्यासपीठावर बिटको महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ. मंजुषा कुलकर्णी , तंत्रनिकेतनच्या प्राचार्या डॉ. श्रद्धा देशपांडे , केंद्रीय समन्वय शाळा समितीचे समन्वयक विनोद देशपांडे , सौ. नेहा रायरीकर , श्री. आर . एम . चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सौ.दिपाली रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जेडीसी बिटको मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व सोसायटी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी करताना संस्थेच्या नाशिकरोड केंद्रातील आढावा सांगून स्व.प्राचार्य ह. मा. रायरीकर यांनी दिलेल्या देणगीतून आपल्या आईच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांविषयी अवगत केले . यावर्षी ११ वा पुरस्कार वितरण कार्यक्रम असल्याचे आवर्जून सांगितले . यावेळी संस्थेच्या नाशिकरोड केंद्रातील शाळांमध्ये इ. १ वी ते इ. १० वी मध्ये करण्यात आला .
याप्रसंगी मुख्याध्यापक जे. एन. आहेर , सौ. संगिता गोसावी , आर.एम. चौधरी ,सौ.एच. एस. तांबोळी , श्री. नंदन सर यासह जयरामभाई प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल , जेडिसी बिटको इंग्लिश मिडीयम प्राथमिक व माध्यमिक हायस्कूलचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी , सत्कारार्थी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रमुख अतिथी सौ.नेहा रायरीकर यांनी आपल्या मनोगतात नाशिक रोड केंद्राशी रायरीकर परिवाराचा जुना ऋणानुबंध असून विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी कसून प्रयत्न करा ,संस्थेचे नाव उज्वल करा , शिक्षणाशिवाय प्रगती नाही , प्रत्येकाने स्वावलंबी व्हावे , दररोज ध्यानधारणा करा , त्यातून एकाग्रता , स्मरणशक्ती व कार्यक्षमता वाढीस लागते असे सांगितले . श्री. विनोद देशपांडे यांनीही याप्रसंगी यथोचित मार्गदर्शन केले . मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आले – यात सौ. करूणा गैवे , श्रीमती आफरीन पठाण , सौ. अनुराधा दुसाने यांना सन्मानित करण्यात आले .सौ. भक्ती कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहिणी बटवाल यांनी तर आभार श्री. आर. एम. चौधरी यांनी मानले .
दिव्य भारत बी.एस.एम. न्यूज : मुख्य संपादक – डॉ . भागवत महाले, मोब. ८२०८१८०५१०
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा