“वर्धापन दिन हा संकल्प दिन व्हावा “- श्री. प्रकाश पाठक
गोखले शिक्षण संस्थेच्या एस.एम.आर. के महिला महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न
दिव्य भारत बी.एस. एम.न्यूज :- प्रतिनिधी नाशिक :- प्रा . छाया लोखंडे
नाशिक, ता . २८ ( दिव्य भारत बी.एस. एम.न्यूज ) :- नाशिक जिल्ह्यात स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गोखले शिक्षण संस्थेच्या एस.एम.आर. के महिला महाविद्यालयाचा ३९ वा वर्धापन आज महाविद्यालयाच्या पाटणकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते .प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या संस्थेच्या एच .आर .डायरेक्टर डॉ .सौ . दीप्ती देशपांडे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले .
आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला . कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नात्याने धुळ्याचे विख्यात सनदी लेखापाल व अध्यात्माचे व्यासंगी अभ्यासक व प्रभावी वक्ते माननीय प्रकाशजी पाठक उपस्थित होते .आपल्या भाषणात त्यांनी मातृशक्ती असलेल्या महाविद्यालयात आल्याचा आनंद व्यक्त केला. हया प्रसंगी त्यांनी फाऊंडेशन शब्दाचा अर्थ सांगून समाज जीवनामध्ये स्वतःचे व्यक्तीमत्व समृद्ध व सर्वमावेशक, सुसंपन्न व समर्थ कसे होईल याकडे लक्ष देणं गरजेचे आहे, असे त्यांनी विद्यार्थीनींना सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्त्रीच्या कर्तृत्वाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीमागे स्त्री चे समर्पण असते. ह्याचे अनेक दाखले त्यांनी दिले. याप्रसंगी त्यांनी महापुरुषांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या विदुषींची उदाहरणे देवून स्त्री शक्तीचा गौरव केला . आई ही उत्तम गुरु आहे , हे सांगतांना त्यांनी अनेक महापुरुषांना घडविवाऱ्या मातांची उदाहरणे दिली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ , संस्थेचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी उपस्थित होते .आपल्या भाषणात त्यांनी महाविद्यालयाचे कौतूक केले . वर्धापन दिन कसा साजरा करावा ह्याचे उत्तम उदाहरण एस. एम. आर. के . महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा . डी . के .गोसावी यांनी महाविद्यालयाला ५१ हजार रुपये देणगी दिली . ह्या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . संस्थेचे देणगीदार विक्रम भाई कपाडीया यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्या प्रसंगी महाविद्यालयाचा वार्षिक अंक ‘ शतरूपा’ व संशोधनपर निबंधांचा अंक ‘इम्प्रेशन्स’ गोखले शिक्षणसंस्थेच्या संशोधनपर नियतकालिक ‘स्वयंप्रकाश’ व वाणिज्य विभागाद्वारे आयोजित ‘ डिसरप्टेड ग्लोबल रिकव्हरी अँड इटस् इम्प्लिकेशनस् ऑन इंडियन इकॉनॉमी’ ह्या राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले . महाविद्यालयीन, बोर्डाच्या व विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींना ह्या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विशेष कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा ही ह्या प्रसंगी गौरव करण्यात आला . कार्यक्रमाला सोसायटीचे आस्थापना संचालक शैलेश गोसावी , खजिनदार आर .पी . देशपांडे , प्राचार्य राम कुलकर्णी . प्राचार्य डी.के गोसावी प्राचार्य काद्री, प्राचार्य संजय अमृतकर , प्राचार्या मृणालिनी देशपांडे , उपप्राचार्य डॉ . कविता पाटील , डॉ . नीलम बोकील तसेच सर्व शिक्षक व कार्यालयीन अधीक्षक शरद मोरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रसिका सप्रे व प्रा.गीतांजली गीते यांनी केले तर आभार प्रा .विवेक खरे यांनी मानले .
गुणवंत विद्यार्थिनींची नावे –
१. कु आकांक्षा पानसरे – कनिष्ठ महाविद्यालयात सर्वप्रथम
२. सिद्धी कुलकर्णी -१२ वी गृहविज्ञान
३. दुर्वा विंगळे – १२ वी कला सर्वप्रथम
४.कु संजिरिया कोकणी – १२ वी कॉमर्स
५. कु. दिक्षा खादरी – १२ वी विज्ञान
वारिष्ठ महाविद्यालय –
१.झेनब शाह – तृत्तीय वर्ष गृहविज्ञान
२.कांचन माळी – चतुर्थ वर्ष बी व्ही ए
३.रुपाली मिश्रा – एम ए सर्वप्रथम
दिव्य भारत बी.एस. एम.न्यूज :मुख्य संपादक –डॉ भागवत महाले ,मोब ८२०८१८०५१०