0
1
2
9
1
1
संदीप फाऊंडेशन संचालित फार्मसी महाविद्यालयात “मेरी मिट्टी मेरा देश”उपक्रम उत्साहात…β⇒
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी : डॉ.कमलेश दंडगव्हाळ
β⇒ महिरावनी (नाशिक ), ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयात दि. 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्ताने “मेरी मिट्टी मेरा देश” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बोरसे यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती वर भाषण करत या उपक्रमाचे उद्दिष्टे सांगितले. या प्रसंगी “मिट्टी को नमन विरो को वंदन” या घोषणा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शाहिद झालेल्या वीर व वीरांगनांचे स्मरणात करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बरोबरच 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व रॅलीचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येणार आहे.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले, मो. ८२०८१८०५१०