





सोमपूर सरपंच सौ. क्रांती प्रमोद भामरे यांचा आदर्श निर्णय: मानधन गावासाठी दान, ग्रामसभेत विकासाचा संकल्प

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.27 जानेवारी 2025
- β⇔ताहाराबाद (नाशिक)ता.27 (प्रतिनिधी: शाश्वत महाले ):- सोमपूर गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानंतर दुपारी 1 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न झाली. या वेळी सरपंच सौ. क्रांती प्रमोद भामरे यांनी एक अभिनव निर्णय जाहीर करत आपल्या मानधनाचा उपयोग गावाच्या हितासाठी करण्याचा संकल्प केला.
गावासाठी मानधन दान: सरपंचांनी जाहीर केले की, त्यांना मिळणारे मानधन गावातील कुणाचेही निधन झाल्यास अंत्यविधीच्या आवश्यक सामग्रीसाठी खर्च केले जाईल. त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करत कौतुक केले.
ग्रामसभेत विकासाचा निर्धार: ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियानांत सहभाग घेण्याचा संकल्प करण्यात आला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवर: ग्रामसभेसाठी उपसरपंच दादाजी अहिरे, ग्राम अधिकारी कैलास राठोड, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार भामरे, तात्याभाऊ बोराळे, सुनिता गायकवाड, दादाजी जाधव, समाधान मोरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भामरे, चंद्रकांत भामरे, दीपक भामरे, प्रकाश भामरे, साहेबराव शिंदे, अभिमन निकम, पत्रकार प्रशांत भामरे, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापक खैरनार मॅडम, बचत गट पदाधिकारी रत्ना भामरे, चव्हाण मॅडम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवेशद्वार लोकार्पण: ग्रामसभेच्या आधी नंदकुमार भामरे यांनी त्यांच्या वडील कै. नारायण संपत भामरे आणि कै. द्वारकाबाई भामरे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेला दिलेल्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.ग्रामसभेचे अध्यक्षस्थान: ग्रामसभेच्या अध्यक्षपदी जिभाऊ आबा भामरे यांनी भूमिका बजावली.सोमपूर ग्रामस्थांचा विकासासाठी घेतलेला पुढाकार आणि सरपंचांचा निर्णय संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
-
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )