प्राचार्य डॉ.डी. डी. लोखंडे यांचा अभ्यासक्रम मंडळावर निवड झाल्याबद्दल सत्कार
दिव्य भारत बी एस एम न्यूज : सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम
सायखेडा (ता .निफाड )ता १५ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ):- जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी षटकोपाचार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ डी डी लोखंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल विद्यालय परिवाराच्या वतीने प्राचार्य श्री नवनाथ निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री गोसावी पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे अरुण सावंत राजेंद्र कदम, संजय बोरगुडे ,श्री संजय भोई ,पंकज गांगुर्डे, अवधूत आवारे ,पद्माकर पंगे ,ज्ञानेश्वर करपे ,श्रीमती झांबरे ,श्रीमती सीमा गोसावी ,प्रतीक्षा शिंदे ,सविता भारस्कर ,सविता घुले ,वृषाली शिंदे, विजया मोरे, श्रीमती राजोळे ,संजय चौधरी ,शरद वाणी ,सोमनाथ शिंदे, संपत कांडेकर विलास महाले ,अशोक टरले मच्छिंद्र गोहाड ,श्री मोरे, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत आवरे यांनी केले तर आभार अशोक टरले यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा