β :पुणे :⇔शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालय खराडी येथे 62 वा राष्ट्रीय फार्मसी सप्ताह उत्साहात साजरा- (प्रतिनिधी :विपुल धसाडे)
β :पुणे :⇔शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालय खराडी येथे 62 वा राष्ट्रीय फार्मसी सप्ताह उत्साहात साजरा- (प्रतिनिधी :विपुल धसाडे)
शंकरराव उरसळ फार्मसी महाविद्यालय खराडी येथे 62 वा राष्ट्रीय फार्मसी सप्ताह उत्साहात साजरा
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि 25 नोव्हेंबर 2023
β⇔पुणे, ता. 25 ( प्रतिनिधी :विपुल धसाडे) :- संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमधील फार्मासिस्टचे योगदान अत्यंत प्रभावी आहे, यामुळेच आज संपूर्ण जगामध्ये फार्मसी क्षेत्रामध्ये भारत देश अग्रेसर आहे ,असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य डॉ. अशोक भोसले यांनी केले . यावेळी त्यांनी राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाच्या सर्वांना शुभेच्छा देत ,ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताह अंतर्गत आयोजित आरोग्याची काळजी व समाज जनजागृती रॅली उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
फार्मसी शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेऊन समाजामधील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका सर्वांपर्यंत पोहोचवणे व समाजाच्या आरोग्याशी निगडित कार्य करणे आवश्यक आहे, असे मत या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी चंदन नगर पोलीस स्टेशन सब इन्स्पेक्टर युसुफ पठाण यांनी व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या रॅलीचे उद्घाटन युसुफ पठाण पोलीस सब इन्स्पेक्टर चंदननगर, चंद्रकांत झुरंगे ए एस आय, लक्ष्मण नवघणे ए एस आय, सौ मनीषा जगताप पोलीस हवालदार, जालिंदर असवले एस आय टी चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक भोसले, उपप्राचार्य डॉ विजया बर्गे आणि डी फार्मसी विभाग प्रमुख डॉ सुजित काकडे यांच्या शुभहस्ते झाले.
या रॅली दरम्यान खराडी गाव, रक्षक नगर परिसरातील विविध ठिकाणी आरोग्य व्यवस्थेतील फार्मसी क्षेत्राचे कार्य, अँटिबायोटिक्सचा गैरवापर, रुग्ण समुपदेशनाची काळाची गरज, तसेच समाजातील आरोग्य विषयी निष्काळजीपणा आणि गैरसमज याबाबत पथनाट्याद्वारे समाज प्रबोधन केले. या रॅलीसाठी चंदननगर पोलीस स्टेशन, विमान नगर पोलीस स्टेशन वाहतूक विभाग पुणे स्टेशन सर्व सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य झाले. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी उत्साहात सहभागी झाले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी केले तर आभार राष्ट्रीय फार्मसी सप्ताह समन्वयक प्रा केतकी लखाने व प्रा. विपुल धसाडे यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो ८२०८१८०५१०