β : नाशिक :⇔ जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल,उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे निवडश्रेणी मिळाल्याबद्दल सत्कार-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : नाशिक :⇔ जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल,उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे निवडश्रेणी मिळाल्याबद्दल सत्कार, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल , उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे निवडश्रेणी मिळाल्याबद्दल सत्कार, शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 14 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिक, दि.14 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):- नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक २५ वर्षांपासून निवडश्रेणीपासुन वंचित आहेत , ही बाब गंभीर होती. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक या संघटनेने एक वर्षापासून निवडश्रेणी संदर्भात लढा सुरू केलेला होता. यासंदर्भात प्रथमतः शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सदरील प्रलंबित निवड श्रेणी काम सहज न होण्यासारखे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्य सरचिटणीस (कार्यवाह)संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांची भेट घेवून या निवड श्रेणी प्रस्तावनाबाबत सविस्तर चर्चा केली.
तदनंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल व शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणली. सदरील काम पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजनबद्ध कार्यवेळ सुची व त्या पद्धतीने काम करण्याचे आदेश दिले. यात त्यांचा कामाचा अनुभव व शिक्षकांप्रती सहानुभूती दिसून आली. यापूर्वी त्यांनी शिक्षकांच्या वेतनाबाबत तत्परता दाखवून दरमहा एक तारखेला वेतन करण्याची आश्वासन दिल्याप्रमाणे वेतन होत आहे.असे पगार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलने ,आमरण उपोषण तसेच शालेय वेळेव्यतिरीक्त मनुष्यबळ देऊन योग्य ती मदत करुन नाशिक जिल्हाभरातील एकुण २४३०प्राप्त प्रस्ताव पैकी २३४१ मंजूर करण्यात आले आहेत.नाशिक जिल्ह्यात अशक्यप्राय वाटणारी निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षक वारंवार देऊन वैतागले होते.परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणी लागु करणेबाबत वर्षभरापासून लढा न्यायालयीन,धरणेआंदोलन,आमरण उपोषण,प्रशासनास सहकार्य केले.सदर वेतनश्रेणी मंजुरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले,त्याचेच फलित निवड श्रेणी सुरुवात कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, अधिक्षक श्रीधर देवरे,सहाय्यक प्रशासन अधिकारी रविंद्र आंधळे,शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज,धनंजय कोळी,उपमुख्यकार्यकारी रविंद्र परदेशी व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरी होऊन मंजूर करण्यात आहे , अशी माहिती संजय बबनराव पगार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ने प्रश्न योग्य प्रकारे हाताळला यामुळे शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल ,प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांनी आभार मानले. त्यानंतर त्यांचे सन्मान करत आदरार्थ सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी लिपिक व त्यांना मदत करणाऱ्या शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शालेय वेळेव्यतिरीक्त या कामास विशेष मदत केली. म्हणून लिपिक चारुशिला भोसले , शिक्षक -सखाराम सोनवणे, प्रविण कोळी,दिपक आहिरे,संजय गवळी , राजेंद्र अहिरे , मारुती कुंदे, किशोर मेणे यांचा सत्कार केला आला. यासत्कार प्रसंगी जिल्हा नेते रमेश गोहिल,जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, कार्यवाह राजेंद्र खैरनार, कोषाध्यक्ष सुनील आहिरे, कार्याध्यक्ष शांताराम कापसे, जितेंद्र खोर,उपाध्यक्ष दिपक खैरनार, तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, कार्यवाह रवींद्र ह्याळिज, सल्लागार राहुल परदेशी , मुख्याध्यापक प्रतिनिधी चंद्रकांत पवार,सुभाष बर्डे, भाऊसाहेब भदाणे, राजेंद्र पवार, कैलास पाटोळे, उपाध्यक्ष प्रविण दळवी, सुदाम बोडके,दिपाली थोरात,अशोक पवार, अरविंद माळी, रविंद्र भरसट ,उत्कर्ष कोंडावार, मानसिंग महाले, अनिल खैरनार, अविनाश पाटील,शिवाजी ठाकरे,प्रभाकर नेरकर आदी उपस्थित होते.
“शिक्षण विभागाने वेळेत केलेल्या कामकाजामुळे आणि शिक्षक प्रतिनिधींच्या मदतीमुळे सदरची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारे काम झाले. किती वर्षाचा निवड श्रेणी सारखा प्रलंबित प्रश्न माझ्या कार्यकाळात पूर्ण झाल्याचे समाधान वाटते.“ :– आशिमा मित्तल, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक.
“शिक्षकांचे वेतन एक तारखेस करणे त्याप्रमाणे निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीसारख्या प्रलंबित कामांना प्राधान्य दिले. शिक्षकांची प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहणार नाही, कारण शिक्षकांचे प्रश्न वेळीच निकाली निघाल्याने शिक्षकांमध्ये अध्यापनासाठी उत्साह निर्माण होतो.”– रविंद्र परदेशी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी
” “निवड श्रेणी सारख्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवतांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी व शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवुन शिक्षकांप्रती सहानुभूती दिसली. तसेच लिपिक व कार्यकर्त्यांची अपार मेहनतीचे यश होय“ – संजय पगार, (राज्य सरचिटणीस/कार्यवाह महाराष्ट्र राज्य, शिक्षक परिषद प्राथमिक विभाग )
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510