Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंग

β : नागपूर β⇔ नायलॉन मांजा मानव आणि पशु-पक्षांसाठी जीवघेना; सावधान  (  प्रतिनिधी : रमेश  लांजेवार )

β : नागपूर β⇔ नायलॉन मांजा मानव आणि पशु-पक्षांसाठी जीवघेना; सावधान  (  प्रतिनिधी : रमेश  लांजेवार )

018491

  नायलॉन मांजा मानव आणि पशु-पक्षांसाठी जीवघेना; सावधान

   β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक  : मंगळवार  : दि.2 जानेवारी 2024  
  β⇔ नागपूर, ता.1 (  प्रतिनिधी : रमेश  लांजेवार ) :-  यावर्षी सुध्दा मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर  नायलॉन मांजाच्या विक्री व खरेदीवर बंदी आहे. तरीही यावर्षीसुध्दा नायलॉन मांजाची विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.साधारणता 1 जानेवारी नंतर पतंगीचा जल्लोष दिसून येईल.त्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा खरेदी करणारे बहाद्दर आतापासूनच नायलॉन मांजा खरेदीच्या तयारीत असल्याचे दिसून येते. नागपूरात सर्वाधिक नायलॉन मांजाची आवक उत्तर प्रदेशच्या बरेली आणि गुजरातच्या वडोदरा येथून होत असल्याचे सांगितले जाते.म्हणजेच नायलॉन मांजा धोका समाप्त झालेला नाही. त्यामुळे नायलॉन मांजावर बंदी असुन सुद्धा विक्री होवू शकते याला नाकारता येत नाही.
                      नायलॉन मांजा मानव आणि पशु-पक्षांसाठी जीवघेना व घातक आहे त्यामुळे नायलॉन मांजाचा “बहिष्कार” सर्वच स्तरातून होने अत्यंत गरजेचे आहे.संक्रांत म्हटली की पतंग आलीच पतंगी शिवाय संक्रांत अधुरी असल्याचे लहान मोठ्याना वाटत असते. परंतु काही नागरिक व मुलं यांनी जर चुकीचा मार्ग अवलंवीला किंवा निष्काळजीपणा केला तर मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होते याला नाकारता येत नाही.नायलॉन मांजाच्या बंदीबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संघटना, संस्था व जनता आवाज उचलत आहे आणि गेल्या 10 वर्षात अनेक दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जिवीत हानीसुध्दा झाल्याचे सर्वांनाच ग्यात आहे.यात काहींना आपला प्राण सुध्दा गमवावा लागला. कायद्याच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून नायलॉन मांजावर पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे.तरीही राज्यात सध्याच्या परिस्थितीत “नायलॉन मांजा” विक्रीला येण्याची चिन्हे दिसत आहेत.
            दिनांक 5 जानेवारी 2021 ला अंगावर शहारे येणारी घटना कोराडी परिसरात घडली पतंग पकडतांना रेल्वेखाली कटुन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मागील वर्षी नायलॉन मांजामुळे नागपुरमध्ये 300 हुन अधिक मानवी दुर्घटना झाल्यात व पशुपक्षांच्या 600 हुन अधिक दुर्घटना झाल्याचे निदर्शनास आले.त्याचप्रमाणे मागीलवर्षी गुजरातमध्ये पतंगबाजीमध्ये 800 हुन अधिक मानवी दुर्घटना झाल्यात यात छतावरून पडुन 100 हुन अधिक घायल झालेत व 10 जनांचा मांजाने गळा कापुन मृत्यू झाला अशा भयानक घटना नायलॉन मांजामुळे राज्यासह देशातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता नुकतीच सामना वृपत्रातील माहितीनुसार दिनांक 24 डिसेंबर 2023 रविवारला दिंडोशी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई(बीट मार्शल)म्हणून काम करीत असलेल्या समीर जाधव हा शिपाई ड्युटीवरून मोटारसायकलने वरळी येथील घरी जात असताना मांजाने गळा चिरला व त्यांचा इस्पितळात मृत्यू झाला असे भयावह प्रकार नायलॉन मांजामुळे होत आहे.म्हणजेच यावरून स्पष्ट होते की महाराष्ट्रातील नायलॉन मांजाच्या दुर्घटना कमी न होता वाढतच आहे.त्यामुळे पतंगीच्या नादात जीवीत हाणी केव्हाही ओढावु शकते याला नाकारता येत नाही.त्यामुळे सावधगिरीचे उपाय म्हणून घरातील परिवाराने डोळ्यात तेल घालून मुलांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता “नायलॉन मांजाचा बहिष्कार” अत्यंत आवश्यक आहे.या भयानक घटनेमुळे नायलॉन मांजाला “जिवघेना मांजाच” म्हणावा लागेल. ह्या घटना मोजक्या राज्यातील आहेत.परंतु संपुर्ण भारतात नायलॉन मांजामुळे मानवी व पशुपक्षांच्या हजारो दुर्घटना दरवर्षी होत असतात.
                         एखाद्या विजेच्या ताराला जर पतंग अडकली तर विजेचे तार एकमेकांवर आदळतात व त्याचा स्पार्क होतो अशा वेळेस पतंग उडविणाऱ्याला कदाचित आपला प्राणसुध्दा गमवावा लागतो.त्यामुळे मी सर्व पतंग शौकीनांना विनंती करेल की नायलॉन मांजाला येणाऱ्या नविन वर्षाच्या निमित्ताने “टाटा बाय बाय”करून कॉटनच्या धाग्याने पतंग उडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.सर्वांना माहीत आहे की दरवर्षी नायलॉन मांजामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी, मोठ्या दुर्घटना व वेळप्रसंगी यात अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागतात.त्याच प्रमाणे अनेक पशु-पक्षांनासुध्दा आपले प्राण गमवावे लागतात.पक्षांचा विचार केला तर त्यांची परीस्थिती अत्यंत गंभीर, भयावह व बिकट आहे.कारण आज वाढत्या प्रदूषणामुळे त्यांचे जगने अत्यंत कठीण झाले आहे.पक्षांना हवेत जास्त वेळ रहावे लागते.त्यामुळे त्यांना प्रदुषणाचा व आता नायलॉन मांजाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो.असे सांगण्यात येते की “लॅन्सेट मेडिकल जर्नल”च्या अहवालावरून असे दीसुन येते की प्रदुषणाच्या बाबतीत संपूर्ण जगाचा विचार केला तर”भारत प्रदुषणाचे माहेरघर”बनल्याचे दीसुन येते.यामुळे भारतात दरवर्षी प्रदुषणामुळे 30 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागतात यांच्या तुलनेत पक्षांची दुप्पटीने म्हणजे प्रदुषणामुळे 60 हजार पक्षांची जिवीत हानी होते.त्यामुळे आपणाला प्रदुषणावर जेवढी मात करता येईल तेवढी अवश्य करावी.परंतु संक्रांतीच्या शुभपर्वावर नायलॉन मांजामुळे पक्षांची जिवीत हानी होणार नाही याची काळजी व जबाबदारी आतापासूनच जनतेने घ्यावी.पोलिस विभाग याबाबत सतर्कता बाळगुन लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करेलच व करीत आहे. परंतु जनतेनी पोलिस विभागाला सहकार्य केले पाहिजे.नायलॉन मांजा हा मांजा नसुन “जहरीली तलवार”आहे कारण आपला किंवा पक्षांचा गळा “कळत न कळत” केंव्हाही कापु शकते.मागील वर्षी अनेकांचा मांजराने गळा कापल्या गेला यात ते गंभीर जख्मीसुध्दा  झालेत.त्यामुळे पतंग उडविताना सावधगिरीने पतंग उडवावी व नायलॉन मांजाचा “बहिष्कार”करावा.पतंग उडवा परंतु जीवाशी खेळु नका यातच सर्वांचा आनंद आहे.कारण एक छोटीशी चूक मोठी दुर्घटना ओढावू शकते याला नाकारता येत नाही.
               संक्रांतीचा आनंद भरपूर घ्या! परंतु जिवावर बितण्यालायक कोणतेही कृत्य होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.यातच सर्वांचा आनंद आहे.कायदा व पोलीस विभाग आपले काम करते.परंतु आपणच तटस्थ रहालो तर नायलॉन मांजावर मात करू शकतो याला नाकारता येत नाही.सध्याच्या अत्याधुनिक युगात नायलॉन मांजाची विक्री ऑनलाईनेसुध्दा होवू शकते.मकरसंक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासन प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा जप्तीची कारवाई  युद्ध पातळीवर करीत यात शंका नाही.सरकारने सर्वप्रथम ऑनलाईन नायलॉन मांजावरील विक्रीवर बंदी आणायला हवी.अशा कठीण परीस्थितीत नायलॉन मांजाला रोखण्यासाठी प्रशासनापेक्षा समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.तेव्हाच नायलॉन मांजा हद्दपार होवु शकतो.त्यामुळे याकरिता प्रशासन व आमजनता यांच्यात तालमेल असने गरजेचे आहे. यावर सरकारने जातीने लक्ष दीले पाहिजे व जनतेनीसुध्दा यावर लक्ष ठेवण्याची अत्यंत गरज आहे.पालकांनी आतापासूनचआपल्या मुलांना नायलॉन मांजा पासुन दुर ठेवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करावा व नायलॉन मांजराचे दुष्परिणाम समजून सांगावे.सरकार व पोलीस विभाग यावर लक्ष ठेवुन आहे.परंतु नागरिकांचेसुध्दा कर्तव्य आहे की जी वस्तु “घातक आणि जिवघेनी”आहे आणि ती आपण रोखु शकतो ती रोखलीच पाहिजे.”यामुळे अपघातावर आळा बसेल व पशुपक्षांचे प्राण वाचतील”पतंगीचा आनंद भरपूर घ्या.परंतु नायलॉन मांजाला “हद्दपार”करा. नायलॉन मांजराची सुरूवात चिनपासुन झाली.चीन हा नेहमीच भारता विरुद्ध जहर उगारत असतो आणि उगारत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाला “हद्दपार”करण्याची जबाबदारी विक्रेते,ग्राहक व नागरिकांची आहे.कारण नायलॉन मांजा हे आपल्यासाठी “जहरच”आहे. नायलॉन मांजा बद्दल नागरिक सतर्क रहाले तर नायलॉन मांजराची विक्री होणारच नाही व प्रशासनाला कारवाईची गरजसुध्दा भासणार नाही.त्यामुळे नागरिकांनी सर्वप्रथम सतर्क रहाने गरजेचे आहे.नायलॉन मांजामुळे होणारे अपघात सांगुन येत नाही ते केंव्हाही कधीही होवु शकतात. त्यामुळे नायलॉन मांजाला रोखण्याचे काम सर्वप्रथम नागरिकांचे आहे.मग प्रशासनाचे राहील.आपण नोटबंदीचा मार झेलु शकतो,महागाईला झेलु शकतो, गारपीट,थंड हवा झेलु शकतो,प्लाष्टीकवरील बंदी सहन करू शकतो मग नायलॉन मांजाला “हद्दपार”का करू शकत नाही? शेतकरी “ओला व सुका” दुष्काळाशी सामना करू शकतात मग आपण नायलॉन मांजराला “नस्तनाबुत” करण्यासाठी प्रयत्न का करू शकत नाही?मानवाने मनात ठानले तर सर्वचकाही शक्य आहे.मग आपण स्वत: आपला व पशुपक्षांचा जिव वाचविण्याकरिता नायलॉन मांजराला हद्दपार का करू शकत नाही? सावधगिरीचे उपाय म्हणुन मी सांगू इच्छितो की मुलांनी कटलेल्या पतंगीच्या मागे धावु नये,वाहन चालकांनी कटलेल्या पतंगीच्या धाग्यापासुन  सावधानी बाळगावी.”सर्व अपघात टाळा व प्राणीमात्रांचे प्राण वाचवा”. आणि पतंगीचा आनंद घ्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या निमित्ताने नायलॉन मांजाला “टाटा-बाय-बाय”करा!                                                                                               
 लेखक
                                                                                                                                                                      रमेश कृष्णराव लांजेवार.                                                                                                   

β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस - ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)

    मो.नं.9921690779, नागपूर   
   (   माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)  
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज:मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो .८२०८१ ८०५१० 
                                 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!