Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

β : नागपूर :⇔ प्रभु रामचंद्राचे आदर्श सामोर ठेऊन राजकीय पुढाऱ्यांची निस्वार्थ देशसेवा हवी-(प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)  

β : नागपूर :⇔ प्रभु रामचंद्राचे आदर्श सामोर ठेऊन राजकीय पुढाऱ्यांची निस्वार्थ देशसेवा हवी-(प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)  

018491

 प्रभु रामचंद्राचे आदर्श सामोर ठेऊन राजकीय पुढाऱ्यांची निस्वार्थ देशसेवा  हवी  

Ram Navami in Ayodhya Live Updates Ram Lalla Surya Tilak Abhishek Photos Videos Ram Mandir News in Hindi

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 16 एप्रिल  2024

β⇔ नागपूर , दि.16 (प्रतिनिधी : रमेश  लांजेवार):-चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात, या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले जाते.महाराष्ट्रात नवीन वर्ष “गुढीपाडवा” म्हणून साजरा केला जातो तर इतर राज्यांत वेगवेगळ्या पध्दतीने हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केल्या जातो.याच महीण्यात चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामाचा जन्म झाला. त्याचप्रमाणे याच महीण्यात सात दिवसांनी महाबली हनुमान यांचा जन्म झाला.म्हणजे चैत्र महिन्यात मर्यादापुरुषोत्तम रामांचा जन्म व महाबली हनुमान यांचा जन्म म्हणजे एक दैवी लीलाच म्हणावी लागेल. यामुळे संपूर्ण भारतात दरवर्षी रामनवमी व हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने व थाटाने साजरी करण्यात येते.

                   रामनवमीला भजन, कीर्तन व मोठ-मोठ्या झांक्या काढून संपूर्ण भारतात श्री रामांचा  जयघोष दिसून येतो व या दिवशी संपूर्ण माध्यमातून श्रीरामाचे नामस्मरण केल्या जाते.आज जगात ज्या-ज्या ठीकाणी सत्यता व संयमता दिसून येते यामागे मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचीच लिला आहे. भारतात बहुसंख्य हिंदू असतांना सुध्दा सर्व धर्मांना घेऊन चालण्याचा मान फक्त भारतीय संस्कृतीमध्येच आहे. कारण संस्कृती,सन्मान,सभ्यता,संयमता, दृढनिश्चयता, आपुलकीची भावना आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता फक्त भारतीय संस्कृतीमध्येच दिसून येते.कारण भारतात सर्वच धर्मांचे लोक एकोप्याने आणि आनंदाने रहातात.त्यामुळे संपूर्ण हिंदु धर्म राममंदिर बांधकामाच्या प्रतीक्षेत होता आणि ते साध्य झाले.त्यामुळे आज आपल्याला अयोध्येत भव्य राममंदिर दिसून येते.आज भारतात हिंदू धर्मामध्ये संयमता दिसून येते ती फक्त प्रभूराचंद्राच्या आशीर्वादानेच.यामुळे विदेशी नागरिकांची जगातील पहीली पसंती भारत असल्याचे दिसून येते.यामागे फक्त प्रभू राचंद्रांचेच आदर्श म्हणावे लागेल व आहे. प्रभूराचंद्राचा आशिर्वाद भारतीयांना आहे.त्यामुळे या धर्तीवर प्रभूश्रीराम सर्वांचेच आहे आणि राहील.कारण अयोध्येत राम जन्मले हे वास्तव्य आहे. याची पुष्टी भारतीय पुरातत्त्व विभाग व विदेशातील अनेक पुरातत्त्व विभागाने जाहीर केले आहे.श्री रामाचा जप आपण जन्मा पासून तर शेवटपर्यंत करीत असतो. त्याचप्रमाणे कठीण प्रसंगी रामाचे नामस्मरण करून येणाऱ्या अडचणी व दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यामुळे प्रभूराम सर्वांच्या मनात, हृदयात, आकाश-पाताळ, पुर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिन,निसर्ग,वन्यप्राणी,मानव-जिवजंतु यांच्या मना-मनात वावरत असतो.त्यामुळेच जगातील इतर देशांच्या तुलनेत प्रत्येक विदेशी नागरिकाची पहीली पसंत भारत असल्याचे दिसून येते.कारण भारतात सर्वच धर्मांच्या देवी-देवतांचा, साधुसंतांचा व थोरमहात्म्याचा वास आहे. त्यामुळे भारतवासी एकोप्याने राहतात.

              आज जगात भारत विश्र्व शांतीचे प्रतीक आहे हे फक्त प्रभू राचंद्रांच्या आदर्शामुळे. त्यामुळे प्रभूराचंद्राचे महत्त्व आणि त्यांची लीला हिंदू धर्माला ग्यात आहेच. अयोध्येतील राममंदिर भारतीयांच्या मदतीने एवढे भव्य झाले आहे की त्याची संपूर्ण जगात ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यटनाला चालना देणारे ठीकाण बनलेले आहे.त्याचप्रमाणे सात अजुब्यातुन राममंदिर प्रथम क्रमांकावर असल्याचे मी समजतो.त्यामुळे राममंदिर ते राष्ट्रमंदिर ही भुमिका सर्वांनीच अंगीकारली पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदूसंस्कृती जोपासण्याकरीता देशातील प्रत्येक हिंदूनी नवनिर्माण अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामाचे चरन स्पर्श केलेच पाहिजे.भारतातील प्रत्येक धर्माच्या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की श्रीराम सर्वांचे आहे व राहील. श्रीरामाने १४ वर्षे वनवास भोगला,वालीसारख्या अहंकारी शक्तीचा सर्वनाश केला,रूषि-मुनी,साधु-संत, गोरगरीब यांचे संरक्षण केले,रावनासारख्या असुर शक्तीचा नाश केला तेव्हाच रामराज्याची स्थापणा झाली व सत्ययुग प्रस्तापीत झाले आणि तेव्हापासूनच सर्वांच्या मनात प्रभूराचंद्राची धुंद गुंजतांना दिसते.तीच प्रतीकृती आज अयोध्येमध्ये साकार झाली आहे हे हिंदू धर्माचे अहोभाग्यच म्हणावे लागेल.आज अयोध्येतील राम मंदिरमुळे “मन में राम,तन मे राम,घर-घर मे राम” या आवाजाची गुंज आपल्याला संपूर्ण भारतात ऐकायला व पहायला मिळत आहे.आजही जगात अनेक देशांमध्ये हिंदू संस्कृतीची जोपासना केली जाते व हिंदू संस्कृतीचा इतिहास सुध्दा दिसून येतो.यामागचे मुख्य कारण म्हणजे श्रीरामांचे आदर्श आहे.श्रीरामांचा इतिहास आणि वास्तव भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पहायला मिळते. तेव्हाच प्रभुश्रीरामचंद्रांना मर्यादापुरुषोत्तम म्हटल्या जाते.प्रभु राम सत्यतेचे प्रतीक आहे.त्याचे अनुकरण देशातील लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी स्वयंघोषित समाजसेवक यांनी करून जनसेवा करण्याची नितांत गरज आहे.कारण देशातील ९५ टक्के राजकीय पुढारी अहंकारी वृत्तीचे असल्यामुळे भ्रष्टाचाराने लिप्त आहेत.या कलयुगात राजकीय पुढारी समाजसेवेपेक्षा स्वतःची सेवा करण्यात मग्न(गुंग)असतात.”मु मे राम बगल में छुरी” अशा प्रकारची असुरी भावना त्यांच्यात दिसून येते.कारण गरीब व सर्वसामान्यांचे रक्त पीवुन आजचा ९५ टक्के राजकीय पुढारी “रक्तबीज” राक्षसाची भुमिका बजावीतांना दिसून येते.त्यामुळेच देशात भ्रष्टाचार उफाळलेला आहे.

             आज देशातील प्रत्येक राजकीय पुढारी करोडपती झालेला आहे. यामुळेच आज देशात महागाई, बेरोजगारी, भुकमरी,महागडे शिक्षण,शेतकऱ्यांच्या समस्या व आत्महत्यां यांनी जन्म घेतला आहे.मी रामनवमीच्या निमित्ताने देशातील संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांना, लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी  यांना विनंती करतो की रामराज्याची संकल्पना साकार करायची असेल तर आपण वाममार्गाने कमवीलेली व भ्रष्टाचार रूपाने कमविलेल्या संपूर्ण संपत्तीचा त्याग करून सरकारच्या तिजोरीत जमा करावा किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणावा यातच खरे प्रभु श्रीराम यांचे दर्शन दिसून येईल.त्याचप्रमाणे भुकेलेल्यांना अन्न हा देवी-देवतांचा मुलमंत्र आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी अंगीकारला पाहिजे.राजकीय पुढाऱ्यांनी गरिब व सर्वसामान्यांची लुटमार थांबवून आणि महागाई कमी करून समाजकार्य करावे यातच खरा प्रभु रामचंद्राचा आदर्श दिसून येईल व पुन्हा आपल्याला भारतात रामराज्य साकार करता येईल.जोपर्यंत देश भ्रष्टाचारमुक्त होत नाही तोपर्यंत भारतात रामराज्य शक्य नाही.याकरीता भ्रष्टाचारावर आळा व अहंकारी राजकीय पुढाऱ्यांच्या चल-अचल संपत्तीची कठोर चौकशी करून यांची संपत्ती जनकल्याणासाठी उपयोगात आणली पाहिजे. यातच आपल्याला रामराज्य खऱ्या अर्थाने दिसून येईल. आजचा राजकीय पुढारी स्वार्थी झाल्यामुळे  व यांच्यात असुरी शक्ती निर्माण झाल्याने देशात अनेक नवीन-नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे देशाच्या १४० कोटी जनतेला आज महागाईचा श्राप बसल्याचे दिसून येते.या असुरी शक्तीला संपवायचे असेल तर प्रभु रामचंद्राचे आदर्श सामोरं ठेऊन राजकीय पुढाऱ्यांनी समाजकार्य करायला हवे.तेव्हाच भारतात रामराज्य प्रस्थापित होईल.रामनवमीच्या पावन दिवसांचे औचित्य साधून संपूर्ण रामभक्तांनी, सामाजिक संघटनांनी, प्रशासनाने व सरकारने आजच्या दिवसाला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून वाढत्या प्रदुषणावर व बदलत्या हवामानावर आवळा घालण्यासाठी वृक्षारोपण करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला पाहिजे.यामुळे निसर्ग प्रफुल्लित होईल व आपल्याला प्रत्येक पानात, फुलात,फळात प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन अवश्य होईल.कारण निसर्गाच्या सान्निध्यातच प्रभु रामचंद्र आहेत. जय श्रीराम!                      लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी,नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, 

β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस - ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)
β : नागपूर :⇔

 β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!