β :सिन्नर :⇔ शाळकरी मुलगा वाहन धडकेत ठार, कंचार कुटुंबावर काळाचा घाला, बोरखिंडगाव शोकाकुल – ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
β :सिन्नर :⇔ शाळकरी मुलगा वाहन धडकेत ठार, कंचार कुटुंबावर काळाचा घाला, बोरखिंडगाव शोकाकुल - ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
शाळकरी मुलगा वाहन धडकेत ठार, कंचार कुटुंबावर काळाचा घाला, बोरखिंडगाव शोकाकुल
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि 30 डिसेंबर 2023
β⇔सिन्नर, ता. 30 ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) :- शाळकरी मुलगा वाहन धडकेने ठार “बोरखिंड ते शिवडे “रस्त्यावर बोरखिंड फाट्याजवळ अकरा वर्षीय शाळकरी मुलगा छोटा हत्ती या वाहनाच्या जोरदार धडकेने ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. हेमंत उर्फ सार्थक कंचार (वय ११ ) ,( रा. बोराखिंड, सिन्नर )असे मृत मुलाचे नाव आहे . सदर घटनेचे वृत्त असे, की हेमंत व त्याचे वडील रामचंद्र मुरलीधर कंचार हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच 15 बी आर 127 ने पांडुर्लीकडून बोरीखिंडकडे जात असता बोरखिंड फाट्या शिवारात छोटा हत्ती क्रमांक एम एच 15 सीके 56 64 या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, या अपघातात मुलगा हेमंत यास डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. असे वृत्त दिव्य भारत बी एस एम न्यूजचे सिन्नर प्रतिनिधी सुरेश इंगळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज: मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०