β : दिंडोरी:⇔”महिलांना मानसिक,भावनिक आधाराबरोबर शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतंत्रता व प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्ये आहे.”-डॉ. भागवत महाले- (प्रतिनिधी:शाश्वत महाले)
β : दिंडोरी:⇔"महिलांना मानसिक,भावनिक आधाराबरोबर शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतंत्रता व प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्ये आहे."-डॉ. भागवत महाले- (प्रतिनिधी:शाश्वत महाले)
“महिलांना मानसिक, भावनिक आधाराबरोबर शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतंत्रता व प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्ये आहे.“– डॉ भागवत महाले
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 9 मार्च 2024
β⇔दिंडोरी, दि.9 (प्रतिनिधी:शाश्वत महाले):- “महिलांना मानसिक, भावनिक आधाराबरोबर शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतंत्रता व प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्ये आहे. असे प्रतिपादन डॉ भागवत महाले यांनी जिल्हा परिषद शाळा करंजवण येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. सदर जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा करंजवण, (ता. दिंडोरी) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती कावेरी बैरागी ह्या होत्या. व्यासपीठावर मुख्याध्यापक प्रकाश गोसावी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रम मोरे, जेष्ठ नागरिक संपतराव कोंड, रवी गांगोडे, शरद भालेराव ,ग्रामपंचायत सदस्य प्रविण गांगोडे, कृष्णा खंबाईत हे उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.भागवत महाले म्हणाले, की महिलांनी आपल्या पाल्यांचा आरोग्य, शिक्षण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याप्रसंगी बोलताना म्हणाले, की जागतिक महिला दिन साजरा करण्याचा उद्देश महिलांचा सन्मान व कर्तुत्वाला आदर करणे हा आहे. त्या निमित्ताने जगामध्ये सर्व महिलांमध्ये मानसिक, भावनिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये स्वतंत्रता व प्रोत्साहन देणे समाजाचे कर्तव्ये आहे. त्याचबरोबर त्यांच्या अधिकाराला मान्यता व आदर राखणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदरी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला – खांदा लावून काम करत आहेत. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले , आनंदीबाई जोशी , अंतराळवीर सुनिता विलियम्स , कल्पना चावला यासारख्या महिलांनी मोठे योगदान दिले आहे , असे यावेळी सांगितले. राजकीय नेतृत्व राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आदीसह आज देखील क्रीडामध्ये सायना नेहवाल , पी.व्ही. सिंधू. मिताली राज, कविता राऊत आदि महिलांचे समाजात स्थान मोठे आहे. म्हणून हा आठ मार्च दिवस 1975 पासून जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दशकामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनाने 1975 ते 1985 या दरम्यान महिलांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होतं. महिलांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचा उपयोग कौशल्य आधारित उद्योगधंद्यामध्ये बचत गटाचा उपयोग करून लघुउद्योग काम करून जीवनमान उंचवावे, असे प्रतिपादन डॉ भागवत महाले यांनी यावेळी बोलतांना केले. त्यांनंतर प्रकाश चव्हाण यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना सांगितले, की महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.
मुख्याध्यापक प्रकाश गोसावी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रम मोरे, जेष्ठ नागरिक संपतराव कोंड, रवी गांगोडे,शरद भालेराव , ग्रामपंचायत सदस्य प्रविण गांगोडे, कृष्णा खंबाईत, संगिता खंबाईत, प्रकाश चव्हाण, प्रिती आहिरे, शिवनाथ चौधरी, गणेश राऊत , राजीव भोये, माता पालक संघ सदस्य व माता विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम आयोजन मुख्याध्यापक प्रकाश गोसावी यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश गोसावी करुन प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवनाथ चौधरी यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510