दोन शाळकरी मुलींचा हातरुंडी दरी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू , सुरगाणा तालुक्यात शोककळा
दोन शाळकरी मुलींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू , सुरगाणा तालुक्यात शोककळा ! पालकांना सतर्क राहण्याचा इशारा
दोन शाळकरी मुलींचा हातरुंडी दरी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू ,
परिसरासह सुरगाणा तालुक्यात शोककळा
रतन चौधरी- सुरगाणा प्रतिनिधी :
सुरगाणा, ता. १६ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृतसेवा ) : हातरुंडी (ता. सुरगाणा ) येथे आजोळी शाळेला सुट्टी लागल्याने आजोबा चिमणा भोये यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दोन नातींचा १५ मे रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान हातरुंडी गावाजवळील दरी तलावातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे. सदर घटनेबाबत हातरुंडी गावचे पोलीस पाटील मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार भावना भागवत गावित ( वय- ८) रा. सुभाषनगर (डोल्हारे) व रेणुका परशराम भोये (वय ६) रा. सोनगीर हल्ली मुक्काम हातरुंडी या दोन्ही मुली सुट्टी निमित्ताने हातरुंडी येथे आजोबा चिमण भोये यांच्याकडे आल्या होत्या. दुपारी साडे पाच वाजेच्या दरम्यान आजोबा समवेत गावाजवळील दरी तलावात रेड्यांना( हेले) पाणी पाजण्यासाठी घेवून गेले होते , मात्र रेड्यांना पाणी पाजून झाल्यावर पाण्यातून बाहेर काढतांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघीजणी पाय घसरुन पडल्याने दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यापैकी भावना ही जिल्हा परिषद शाळा डोल्हारे येथे दुस-या वर्गात शिकत होती तर रेणुका ही सोनगीर येथे बालवाडीत शिक्षण घेत होती. नातेवाईकांनी हातरुंडी येथे धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून त्यांच्या राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. यापुर्वी तालुक्यात राशा,घागबारी येथे अशाच प्रकारे पाण्यात बुडून शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
फोटो- मयत भावना गावित रा. सुभाषनगर सुरगाणा.