β : येडशी(धाराशिव) :⇔ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत येडशीचा विजय पवार विजयी-( प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी(धाराशिव) :⇔ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत येडशीचा विजय पवार विजयी-( प्रतिनिधी : सुभान शेख )
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत येडशीचा विजय पवार विजयी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 22 जानेवारी 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.22( प्रतिनिधी : सुभान शेख ):-रत्नागिरी येथे दि.२० व २१ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. सदर कुस्ती स्पर्धेत येडशी गावचे शिवनेरी तालीम संघाचे वस्ताद – आबा शेळके ( पैलवान ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कुस्ती स्पर्धेत विजय विनोद पवार हे सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेत धाराशिव तालुक्यातील येडशी येथील विजय विनोद पवार यांनी ४८ किलो वजनी गटामध्ये अव्वल कामगिरी करून कुस्ती स्पर्धेत बाजी मारुन विजयी झाले आहेत, त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर धाराशिव येथे हातलाई कुस्ती संकुलात मार्गदर्शन करून सुंदर जवळगे, सुधीर पाटील, अभिराम पाटील, विजय कुमार सस्ते, सुनील शेळके यांनी अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी विजेत्या विजय विनोद पवार याचा सत्कार करण्यात आला. विजय पवार यांचे अभिनंदन करुन संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात ग्रामस्थांनातुन कौतुक केले जात आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०