आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंग
β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात पालक- शिक्षक संघाची सभा उत्साहात संपन्न -प्रतिनिधी : संजय परमसागर )
β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात पालक- शिक्षक संघाची सभा उत्साहात संपन्न -प्रतिनिधी : संजय परमसागर )
0
1
2
3
1
1
बिटको महाविद्यालयात पालक- शिक्षक संघाची सभा उत्साहात संपन्न
β⇒ दिव्य भारत बीएस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार :दि. १८/०९/२०२३
β⇒ नाशिकरोड , ता .18 (प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- ” आपला पाल्य योग्य दिशेने प्रगती करतो किंवा नाही , त्याचे सोबती सकारात्मक विचारांचे आहेत काय , शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य वातावरण आहे काय हे पाहण्याच्या उद्देशानेच शिक्षक पालक विद्यार्थी संघाची संकल्पना रुजली गेली असून आपल्या पाल्यास महागडे मोबाईल न घेता चांगली पुस्तके व साहित्य घेऊन द्यावीत , नवनवीन छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्यावे व अभ्यासाच्या वेळेमध्ये कटाक्षाने लक्ष द्यावे ,” असे उपस्थित शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले .
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बुधवार दि. २६ एप्रिल रोजी कॉमर्स लॅब येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक शिक्षक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती . त्याप्रसंगी त्या बोलत होत्या . आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सोयी सुविधा ग्रंथालय , लॅबोरेटरीज , क्रीडांगणे , महाविद्यालयीन शिस्त तसेच विविध उपक्रम व स्पर्धा , गेस्ट लेक्चर्स तसेच प्रकल्पांबद्दल माहिती दिली . याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे यांच्यासह ,पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे , सचिव अदिती तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . या सभेत पालक प्रतिनिधी समन्वयक म्हणून सौ. सुधा नरवाडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली . उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम व स्पर्धा , पीपीटी सादरीकरण , तज्ञ व्याख्याने , विविध क्विझ , आय गेन स्पर्धा , स्पोर्ट्स स्पर्धा यासह वार्षिक स्नेहसंमेलन स्पर्धा आदींबाबत माहिती दिली . संस्थेच्या ‘ विद्यार्थी देवो भव ‘ या ब्रीदाने यशाची वाटचाल सुरू आहे . सरल , आधारकार्ड यु-डाईस पोर्टलवर अपडेशन माहिती अपलोड व प्रयोग शाळेतील साहित्य, संगणक , ग्रंथालय , स्पोर्ट्स जिमखाना याबाबत अवगत करून पालक हा विद्यार्थी व शिक्षकांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले . याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून सुधा नरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले . सभेचे सूत्रसंचालन सौ.सुजाता गायकवाड यांनी केले तर आभार सौ. हर्षदा तांदळे यांनी मानले . कार्यक्रमास सौ. स्वाती जोशी , सौ. निलिमा कुलकर्णी , सुहास माळवे , डॉ. मनोहर केदार , सुरेखा साळवे , जयश्री गोडसे , विनायक पगारे , राम काटे यासह शिक्षक व पालक प्रतिनिधी सदस्य आदी उपस्थित होते .
β⇒ दिव्य भारत बीएस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१० ८०५१०
0
1
2
3
1
1