0
1
2
9
1
1
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिडको विभागीय अध्यक्षपदी – विक्रांत डहाळे यांची नियुक्ती, शहाणे परिवारातर्फे सत्कार !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार दि 18 सप्टेंबर 2023
β⇒ नवीन नाशिक , ता.23 ( प्रतिनिधी : प्रा.डॉ.कृष्णा शहाणे ) राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवीन नाशिक विभागीय अध्यक्षपदी विक्रांत डहाळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याबद्दल शहाणे परिवाराच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विक्रांत डहाळे यांना सिडको विभागीय अध्यक्ष पदावर नियुक्ती देण्यात आल्याबद्दल शहाणे परिवाराच्या वतीने विक्रांत डहाळे यांना निवासस्थानी पाचारण करून श्री. शंकरराव शहाणे व सौ. कमल शहाणे यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
यापूर्वी विक्रांत डहाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन नाशिक विभागीय उपाध्यक्ष, विभागीय कार्याध्यक्ष, शहर उपाध्यक्ष या पदावर कार्य केलेले आहे. याप्रसंगी जयेश अहिरे, सुशांत डहाळे, डॉ.कृष्णा शहाणे, डॉ राजेंद्र शहाणे, डॉ.सौ. जयश्री शहाणे,सौ.विद्या शहाणे, सार्थक शहाणे, पार्थ शहाणे, अपूर्वा शहाणे आदी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०