





महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सभा संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 17 सप्टेंबर 2024
β⇔दिंडोरी(नाशिक),दि.17 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- आज दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा नाशिक सर्व जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांची सभा ऑनलाईन मोठ्या उत्साहात येथे संपन्न झाली. सदरील मीटिंग संजय बबनराव पगार राज्य सरचिटणीस तथा कार्यवाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर मीटिंगमध्ये खालील विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यात आला, १) जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी घेण्यात येईल, २) पुर्वतयारी -महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा शिक्षक संचमान्यतेत बाबत दि.१५/०३/२०२४ व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा दि. ०५/०९/२०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा दि.25सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सदरील आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे व जनजागृती करावी, 3) शालेय पोषण आहार व नवभारत साक्षरता अभियान विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्व संघटनांना एकत्रित करून सामान्य शिक्षकांच्या हितासाठी न्यायालयीन पातळीवर व स्थानिक स्तरावर समन्वयाने लढा देणार, 4) BLO कामा विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक न्यायालयीन पातळीवर न्याय मागणीसाठी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, 5) निवड श्रेणी मंजूर होऊन पगारात लागू झालेल्या शिक्षकांचा फरक त्वरित मिळावा यासाठी सर्व तालुकाध्यक्षांना पंचायत समिती स्तरावरून अनुदान मागणीची सूचना करण्यात आली. ऑनलाइन टॅब उपलब्ध होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर फरक प्राप्त होईल तसे न झाल्यास सेवाजेष्ठतेनुसार दरमहा शक्य तितक्या शिक्षकांचे बिल काढण्यात येईल. 6) शिक्षक परिषद ही शिक्षकांच्या प्रश्नांवर मेळावे घेऊन आंदोलन करते व शिक्षकांना न्याय मिळवून देते. त्यामुळे शिक्षक परिषदेला तालुका व जिल्हा स्तरावर दिखावा करण्याची आवश्यकता नाही यावर एकमत झाले. निवड श्रेणी टप्पा दोन प्रारूप यादी जाहीर झाली आता अंतिम मंजूर यादी लवकरात लवकर तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. 7) आंतर जिल्हा बदली वेतनवाढ संदर्भात इतर संघटनांनी न्याय मिळवून दिला नाही त्यामुळे या प्रश्नावर योग्य वेळी योग्य प्रकारे शिक्षक परिषद भूमिका घेणार आहे. 8) मुख्यमंत्री युवा महिला रोजगार संदर्भात मुख्याध्यापकांना आदेशाचा आग्रह धरता कामा नये सदरील आदेश पंचायत समिती मान.गटशिक्षणाधिकारी स्तरावरून संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी भूमिका शिक्षक परिषद घेणार,9) बोगस दिव्यांग शिक्षकांविरोधात शिक्षक परिषद आक्रमक होती,आजही आक्रमक आहे भविष्यात बदल्यांच्या वेळी आक्रमक भूमिका घेणार व सामान्य शिक्षकांना तसेच दिव्यांग शिक्षकांना न्याय मिळवून देणार,10) जिल्हाअंतर्गत बदल्यांसंदर्भात ग्रामविकास मंत्रलयात,मान.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व माननीय शिक्षण अधिकारी साहेब यांची भेट घेऊन विनंती /प्रशासकीय online बदल्या व सध्या जिल्ह्यांर्गत विनंती बदल्या करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार,11) प्रथम नेमणूक १९८९,९०,९१निवड श्रेणी मंजूर आहे परंतु पगारात वाढ होत नाही यावर लढा देणार,12) १२वी सायन्स व इतर पदवीधर पदोन्नती, पदवीधर वेतनश्रेणी नियमाप्रमाणे लागु करणे, केंद्रप्रमुख पदोन्नती करणे,
एकंदर चर्चेत सर्व जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुक्यातील अध्यक्ष /सरचिटणीस, पदाधिकारी सहभागी झाले, तरी या मीटिंगमध्ये प्रमुख मार्गदर्शन संजय बबनराव पगार यांनी केले. तर मीटिंगचे सूत्रसंचालन रावसाहेब जाधव जिल्हा प्रतिनिधी तालुकाध्यक्ष दिंडोरी यांनी केले. तर चर्चेत जिल्हास्तरावरून जिल्हा नेते रमेश रघुनाथ गोहील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक खैरनार,उपाध्यक्ष मिलिंद धिवरे, मनोज कुमार सोनवणे जिल्हा सल्लागार, इगतपुरी तालुकाध्यक्ष वैभव उपासनी, राजेंद्र पवार,रविंद्र ह्याळिज, कार्यवाह अशोक पवार (ए टी), शरद ठाकूर मालेगाव सरचिटणीस, डॉ. प्रवीण पाटील तालुकाध्यक्ष नांदगाव, राहुल परदेशी, सुरेश जाधव पदवीधर प्रतिनिधी,संतोष शार्दुल तालुकाध्यक्ष त्र्यंबकेश्वर, पंकज देवरे त्र्यंबकेश्वर , राजाराम वाघ तालुकाध्यक्ष पेठ, प्रशांत शिंदे तालुकाध्यक्ष येवला, प्रकाश माळी, नाना बागुल, कार्याध्यक्ष शांताराम कापसे, जितेंद्र खोर, रविंद्र भरसटसह आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन चर्चेत सहभाग घेतला. तसेच मीटिंगमध्ये सर्व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” ) ऑनलाईन