Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

β : नागपूर :⇔ भारतीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे  कणखर “पोलादी व्यक्तीमत्व”-  लेखक – रमेश कृष्णराव लांजेवार

β : नागपूर :⇔ भारतीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे  कणखर "पोलादी व्यक्तीमत्व"-  लेखक - रमेश कृष्णराव लांजेवार

0 1 2 9 1 1

   भारतीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे  कणखर  “पोलादी व्यक्तीमत्व”-  लेखक – रमेश कृष्णराव लांजेवार

३१ ऑक्टोबर जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे प्रणेते सरदार वल्लभभाई पटेल “स्टॅच्यु ऑफ युनिटी”

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 30 ऑक्टोबर 2023 

β⇔ नागपूर, ता. 29 ( लेखक रमेश कृष्णराव लांजेवार ) :-  गुजरात राज्यातील  नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ ला सरदार वल्लभभाई पटेल नावाचा लोहपुरुष जन्माला आला आणि भारतीय राजकारणात एक पोलादी व्यक्तीमत्व उदयास आले.कारण त्यांनी देशांच्या स्वतंत्र लढ्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांना ‘लोहपुरुष’ व ‘सरदार ‘ ही सर्वोच्च मानाची उपाधी मिळाली. पटेलांनी गुजरातच्या खेडा, आनंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील संपूर्ण ग्रामवासियांना संघटित करून त्यांनी इंग्रज अत्याचाराच्या विरूद्ध मोठा लढा उभारून सत्याग्रह केला.या सत्याग्रहानंतर प्रभावशाली नेता म्हणून गुजरातसह संपूर्ण भारतात त्यांची गणना होवू लागली.अशा परिस्थितीत त्यांनी मागे फिरून न पहाता एक पाऊल पुढे टाकून स्वतंत्र पुर्वकाळात व स्वातंत्र्योत्तर काळात मोलाची भुमिका बजावली व इंग्रजांशी लोहा घेण्याची शपथ घेतली.

               आज आपण त्यांच्या कामांचे अनुकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.आपण त्यांची १४८ वी जयंती साजरी करीत आहोत.त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजचा राजकीय पुढारी देशासाठी काय-काय करू शकतात, त्यावर नजर टाकने गरजेचे आहे.कारण वल्लभभाई पटेल यांनी कठोर परिश्रमाने आणि मोठ्या शिताफीने भारत पाकिस्तान फाळणी नंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतता स्थापन करण्यासाठी मोठी मोलाची भुमिका बजावली व हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून घेणे हे भारतासाठी महान कार्य पटेलांनी केले. हे कार्य जोपर्यंत सुर्य- चंद्र-आकाश-पाताळ आहे, तोपर्यंत कोणीही विसरणार नाही हेही तितकेच सत्य आहे.त्यांच्यातील मुत्सद्देगिरी, कठोरपणा व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केले आणि म्हणूनच ते भारताचे “लोहपुरुष” म्हणून ओळखले जातात.त्याच्या या महान कार्यामुळे आपण समजू शकतो की भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे किती मोठे मोलाचे योगदान आहे हे दिसून येते.

                 सरदार पटेल यांची कार्यशैली व देशासाठी दिलेले मोलाचे योगदान पहाता महात्मा गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना लौहपुरूष ही मोठी उपाधी दिली.त्यांची आठवण निरंतर भारतीयांच्या हृदयात रहावी या उद्देशाने गुजरात मधील नर्मदा येथील सरदार सरोवर बांधच्याजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांची १८२ मीटर (५९७ फुट) उंच धातुंची प्रतिमा बनवीण्यात आली ही प्रतीमा “स्टॅच्यु ऑफ युनिटी” म्हणून जगप्रसिद्ध आहे.याठीकानी जगातील अनेक पर्यटक येवून आपली हजेरी लावतात ही देशासाठी मोठी गौरवास्पद बाब आहे.पटेलांनी देशाला एकत्रित बांधण्याकरीता नेहमीच कसोटीचे प्रयत्न केले.त्यामुळे लौहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून संपूर्ण भारतभर साजरी केली जाते.स्वतंत्रपुर्वकाळात प्रत्येक व्यक्ती देशासाठी मरमीटण्यास तयार होते.त्यांच्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत.लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करतांना राजकीय पुढारी, प्रशासन, सामाजिक संघटना यांनी त्यांची आठवण म्हणुन आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून जयंती साजरी करावी.कारण देशात वाढते प्रदुषण यावर आळा घालण्याचे काम वृक्षलागवडीच्या माध्यमातूनच होवू शकते.आजच्या दिवशी वृक्षलागवड झाली तर हि आठवण निरंतर काळापर्यंत राहील व प्रत्येक झाडाच्या-पाणाच्या-फुलाच्या व मुळामध्ये आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे अनुकरण होईलच सोबतच दर्शन सुध्दा अवश्य अवगत होईल.सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.जय हिंद!

β : नागपूर :⇔ भारतीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे  कणखर "पोलादी व्यक्तीमत्व"-  लेखक - रमेश कृष्णराव लांजेवार

β⇔ अतिथी संपादकीय  लेखक –  रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

 

 

 

 

 

 

 

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!