





सायखेडा विद्यालयात विशाखा समितीचे विद्यार्थिनीं उद्बोधन वर्ग संपन्न
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम
β⇒ निफाड, ता .६ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- सायखेडा जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये विशाखा समितीच्या वतीने सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. रोहिणी घुगे सायखेडा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील उपस्थित होत्या. या उद्बोधन वर्गात डॉ. रोहिणी घुगे यांनी मुलींचे शारीरिक मानसिक आरोग्य आहार व व्यायामाचे महत्त्व ,पालकांचा असलेला मुलांची संपर्क, वैचारिक देवाण-घेवाण या विषयावर सविस्तर माहिती सांगितली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील यांनी मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पोस्को कायदा त्याचे महत्त्व व गरज सविस्तर सांगून अडचणीच्या वेळी हेल्पलाइन क्रमांक 10 91 आवर्जून वापर करावा व पोलिसांची मदत घ्यावी असे त्या म्हणाल्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता भारस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास अॅड. मनोज मेतकर ,प्राचार्य नवनाथ निकम, पर्यवेक्षक दौलत शिंदे ,प्रियंका हांडगे, सीमा गोसावी, सुवर्णा हिरे, प्रियंका राजोळे, तेजस्विनी जाधव, सविता घुले ,श्रीमती झांबरे ,श्रीमती मोरे व विद्यार्थी प्रतिनिधी समीक्षा जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार वृषाली शिंदे यांनी मानले या कार्यक्रमास विद्यार्थिनी व शिक्षिका उपस्थित होत्या.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०