





श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात डॉ. कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 17 ऑक्टोबर 2023
β⇒पंचवटी ( नाशिक), ता. 16 (प्रतिनिधी : अमोल चव्हाण) :- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक अत्यंत प्रेरणास्पद आणि महत्त्वाचे भारतीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या जीवनातील कठिणा इयांपासून मोठ्या पदाच्या प्रतिष्ठेवर कसब केले आणि विद्यार्थ्यांना वाचनाच्या महत्त्वाच्या मार्गाने अगदी आकर्षित केले. त्यांच्या संवादात्मक आणि साधनेवर्गीय व्यक्तित्वामुळे त्यांच्या विचारांनी भारताच्या युवा पिढीला मोजले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती देशभर “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी केली जाते. डॉ. कलाम यांनी विद्यार्थी व युवकांना आपल्या लेखानाने व विचाराने प्रेरित केले. त्यांचे बहुतांश लेखन युवकांना व देशाला दिशादर्शक आहेत. भारताला महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. वाचन संस्कृती रुजल्याशिवाय समाज विवेकी व सुसंस्कृत होणार नाही. देशाला महासत्ता बनविण्यासाठी समाजात वाचन संस्कृती रुजली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी वर्तमान पत्र व अवांतर पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा.
श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, पंचवटी नाशिक येथे वाचन प्रेरणा दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल एस. गुलेचा, ग्रंथपाल, प्राध्यापक वर्ग शिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांनी विद्यार्थ्यांस वाचन दिनाचे महत्व सांगितले ,सर्वांना दिशात्मक वाचन प्रेरणा दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :मो ८२०८१८०५१०
