





राज्यात आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळ 5000 विशेष बस सोडणार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 15 जून 2024
β⇔नाशिक, दि.15 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे ):- यंदा आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आव्हान एसटी महामंडळाने केले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने 5000 विशेष बस गाड्या सोडण्याची नियोजन केले, असून दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर येथे जातात. अनेक त्याचबरोबर प्रवासी स्वतःची खाजगी वाहने, रेल्वे ,एसटी, अथवा विविध दिंडी सोबत चालत पंढरपूर जातात. यंदा भाविकांना थेट स्वतःच्या गावातून पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्थात या प्रवासात 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांना 50 टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना, यासारख्या सर्व सवलती लागू असणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढीनिमित्त 4,245 विशेष बस गाड्या सोडल्या होत्या, त्यातून 18 लाख 30 हजार 934 भाविकांची सुखरूप ने – आण एसटीने केली होती. यावर्षी भाविक वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे 5000 गाड्यांचे नियोजन केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)