β⇔मुंबई :⇔”जुनी पेन्शन योजना विनाअट लागू करण्याची मागणी, २९ ऑगस्टपासून शिक्षक आणि कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर”-राज्य कार्यवाह शिक्षक परिषद : संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
β⇔मुंबई :⇔"जुनी पेन्शन योजना विनाअट लागू करण्याची मागणी, २९ ऑगस्टपासून शिक्षक आणि कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर"-राज्य कार्यवाह शिक्षक परिषद : संजय पगार-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
“जुनी पेन्शन योजना विनाअट लागू करण्याची मागणी, २९ ऑगस्टपासून शिक्षक आणि कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर”– राज्य कार्यवाह शिक्षक परिषद : संजय पगार
“शासनाने विनाअट जुनी पेन्शन योजना संबंधी शासननिर्णय तात्काळ पारित करावा” – राज्य कार्यवाह शिक्षक परिषद : संजय पगार
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 23 ऑगस्ट 2024
β⇔ मुंबई, दि.23 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यवाह संजय बबनराव पगार आणि राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी राज्यातील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,आमदार प्रविण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याआधी मार्च २०२३ आणि डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या बेमुदत संपानंतर शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे २९ ऑगस्ट २०२४ पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व राज्य सरकारी, – निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी राज्यातील राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या अगोदर त्यांच्या जिव्हाळ्याचा मागण्याचा रोष व्यक्त करण्यासाठी माहे मार्च २०२३ व डिसेंबर २०२३ मध्ये बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती. संप आंदोलन न भूतो न भविष्य असे झाले होते. संवेदनशील शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन चर्चा केली व सर्वांना जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन प्रदान करण्यात येईल व त्याचबरोबर इतर मागण्याबाबत ही आश्वासने दिली होती. अधिकारी, कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक लाभ अंतर्भूत असणाऱ्या सुधारित जुनी पेन्शन योजनेची घोषणा अर्थ संकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती.. घोषणा केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेचे आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे वरील पार्श्वभूमीवर सर्वांना जुनी पेन्शन व अन्य प्रलंबित मागण्याच्या अन्य जिव्हाळ्याच्या मागण्या संदर्भात शासन वेळ काढू धोरण अवलंबत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या दुर्लक्ष व दिरंगाईच्या विरोधात २९ ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्र राज्य समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पुनश्च तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय समन्वय समितीने ११ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला आहे. सर्व दूर महाराष्ट्रातील राज्यसरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी २९ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत संपावर जाऊन ते त्यांचा रोष व्यक्त करणार आहेत. शासनाने सदर शासन निर्णय तत्काळ पारित करून हा संघर्ष टाळता येणे शक्य आहे, असे आम्हास वाटते. रास्त जिव्हाळ्याच्या मागण्या संवेद- नशील शासनाने मान्य करावेत अशा आशयाचे निवेदन शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात आले आहे.
अशी माहिती राज्य कार्यवाह माननीय संजय बबनराव पगार यांनी दिली.
प्रतिक्रिया :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा व त्या दृष्टीने राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना संबंधी शासन निर्णय तात्काळ पारित केली तर आंदोलनाचा संघर्ष टाळता येईल. राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू होईपर्यंत मागे हटणार नाही. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या आंदोलनात सहभागी होऊन जुनी पेन्शन बाबत वर्षानुवर्षे चाललेले आंदोलन यशस्वी करूया.– श्री. संजय बबनराव पगार,राज्य सरचिटणीस/कार्यवाह
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )