आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात ‘ उद्योजकता विकास यात्रा ‘ या विषयावर अमोल गायकवाड यांचे व्याख्यान ! ( प्रतिनिधी : संजय परामसागर )
β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात ' उद्योजकता विकास यात्रा ' या विषयावर अमोल गायकवाड यांचे व्याख्यान ! ( प्रतिनिधी : संजय परामसागर )
0
1
2
3
6
4
बिटको महाविद्यालयात ‘ उद्योजकता विकास यात्रा ‘ या विषयावर अमोल गायकवाड यांचे व्याख्यान !
β⇒ दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि .११ सप्टेबर २०२३
β⇒ नाशिकरोड, ता. ११ ( प्रतिनिधी : संजय परामसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एनसीसी आर्मी विंग, एअर विंग, कमवा आणि शिका योजना विभाग, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक व स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता विकास यात्रा’ या विषयावर अमोल गायकवाड (उद्योजक) यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .
याप्रसंगी महाविद्यालयाच्या व्यासपीठावर प्राचार्या प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ . संजय कीर्तने, योगेश शिंदे, विशाल जोशी, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.आकाश ठाकुर, विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. कल्याणराव टकले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष पगार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.कांचन सनानसे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधाकर बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी एकूण १५० रा. से. यो. स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०
0
1
2
3
6
4