0
1
2
9
1
1
खाकी वर्दीतील देव माणसाची आदिवासी पारंपरिक संबळ वाद्य वाजवत निरोप समारंभ
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि.28 जानेवारी, 2024
β⇔सुरगाणा (ग्रामीण), दि.28 (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार) :- आपली कार्यतत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे एखादा पोलिस आधिकारी जनसामान्याच्या मनात घर निर्माण करतो व जनता अशा आधिकारी वर्गाचा मनापासून आदर करतात, त्यांच्या बदलीने भावुक होतात. असे उदाहरण क्वचितच ठिकाणी पाहायला मिळते. मात्र याची प्रचिती आज बा-हे येथे प्रत्येक्ष पहायला मिळाली आहे.
येथील गोरगरीबांचे कैवारी कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्या निरोप समारंभ व सत्कारासाठी बा-हे पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्वस्थरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व शासकीय विभागातील आधिकारी कर्मचारी पोलिस पाटिल , साहेबांना मानणारा मोठा तरुण वर्ग एखाधा पोलिस आधिका-याची बदली झाल्या नंतर सर्व सामने जनता आणि कर्मचारी मिळुन अशाप्रकारे भावपूर्ण निरोप देण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच संपन्न होत आहे.
श्री अनिल वाघ साहेब दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ रोजी पोलिस ठाणे बा-हे ता. सुरगाणा येथे रुजु झाल्यापासुन त्यांनी अनेक समाजोपयोगी व राष्ट्रहित जोपासणारे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. आपल्या बा-हे पोलिस ठाण्याच्या हद्धीतील गाव पाडयांचा विस्तारित असा डोलारा अतिशय शिस्तबंद्ध व कायधाच्या चौकटीत राहुन सांभाळला पोलिस पाटिल पोलिस कर्मचारी मित्र सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात मतदान प्रक्रिया पारदर्शक व शांततामय वातावरणात पार पाडली. मोबाईल मिडीया क्राईम, आरोग्याला घातक असणा-या पदार्थाविषयी जनजागृती करुन व्यसनमुक्ति कडे वाटचाल करण्याविषयी बा-हे आंबुपाडा (बेडसे), खिर्डी, भेगु सावरपाडा, आंबुपाडा, हस्ते, मनखेड येथील शाळा महाविद्यालययात विधार्थीना व्याख्यान देते नेहमीच मार्गदर्शनाची भुमिका पार पाडली. वाघसाहेब रुजू झाल्यापासुन आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भांडण तंटे वादविवाद यांचे प्रमाण कमी झाले आहेत.
बा-हे पोलिस ठाणे येथे येणारे भांडण पोलिस पाटलांच्या मदतीने गावातच वाद मिटु लागले, यांचा मला खुप अभिमान वाटतो गावात सातत्याने पेट्रोलिंग करत असल्यामुळे ब-याच अशा गोष्टीवर आळा बसला. भारतीय राष्ट्रीय सणांच्या दिवशी व पारंपरिक सणांच्या दिवशी राष्ट्रीय ऐक धार्मिक समता सलोखा एकात्मता आणि बंधु भाव जोपासण्यासाठी नागरिकांचे उद्बोधन करुन भारतीय लोकशाही व भारतीय संविधानाची तंतोतंत पालन करुन अंमलबजावणी व बळकटीकरण करतानाचे वाघ साहेबानी कार्य दिसुण आले. ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचार,जातिय तेढ, सोशल मिडीयातील अफवांचे बळी व आर्थिक लुटमार अशा आदि विषयावर नागरीकांमधे नेहमी प्रबोधन करीत असत, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणुन भक्कम पाया असणाऱ्या पत्रकार बांधवाना नेहमीच साहेब आदर करताना दिसले, दरवर्षी पोलिस रायझिंग डे च्या दिवशी विविध कार्यक्रम राबवून पोलिसांबद्दलची आदरयुक्त सहकार्याची भावना वॄद्धिंगत करुन पोलिस दलाच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय याब्रीदवाक्याची सार्थता वास्तवात उत्तरविण्याचा प्रयत्न केला. प्रशासनातील वरिष्ठाच्या आदेशाचे पालन व वानम्रतेने संवाद साधणे आणि कार्यालयातील सहकारी कर्मचा-यांशी मनमीळावू व हसत खेळत काम करित राहीले, साहेब नेहमी अग्रेसर राहिले महत्वाचे म्हणजे बा-हे परीसरात जल परिषद मित्र परिवार यांच्या समवेत पाणी आडवा पाणी जिरवा वनराई बंधारे वॄक्ष लागवड अशा कार्यक्रमात वाघ साहेब यांचा सिहाचा वाटा आहे.