





प्रा.डॉ. भागवत महाले यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. २६ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिक , ता. २६ ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- नवीन शैक्षणिक धोरण हे कौशल्याधिष्ठी आणि बहुअंगी असून विद्यार्थी केंद्रीत अध्ययन – अध्यापनावर भर देण्यात आलेला आहे. शिक्षण तज्ज्ञ व अभ्यासक – सचिन जोशी यांनी केले. गीरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित “सामाजिक परिवर्तनात नव्या शैक्षणिक धोरण” या विषयावर आधारित चर्चासत्र नुकतेच नाशिक येथे संपन्न झाले ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढे म्हणाले की, ज्या देशात शिक्षकांचा सन्मान केला जातो, त्या देशाची सांस्कृतिक परंपरा मोठी असते , तेथील तारुण्य चिरंजीव राहते. शिक्षण आणि शिक्षक हे खरे समाज मूल्याचे माध्यम आहेत, म्हणून समाज परिवर्तनासाठी आपल्याला शिक्षणाची ही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी यांनी गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने श्रावणाच्या औरंगाबादकर सभागृहात ” सामाजिक परिवर्तनात नव्या शैक्षणिक धोरण चर्चासत्र व कृतिशील आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मविप्र संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा . डॉ. भागवत शंकर महाले यांचा शैक्षणिक क्षेत्रात संशोधन, उपक्रमशील प्राध्यापक व सामाजिक कार्याबद्दल माजी आमदार नानासाहेब बोरस्ते , शिक्षणतज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी, डॉ. हेमलता बिडकर , डॉ. प्रकाश कोल्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसंगी आयोजक गिरणा गौरव परिषद प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रवींद्र सुरेश पवार , संयोजक – खंडू मोरे, साहित्यिक प्रा डॉ. शंकर बोराडे, सौ.वैशाली महाले, लीना महाले, शाश्वत महाले , आदीसह बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ शंकर बोराडे हे होते. कार्यक्रमाप्रसंगी माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते म्हणाले , की शिक्षण पद्धतीत बदल होत असताना आपण बदलांबरोबर बदललेले पाहिजे त्याशिवाय आपला काळाचा वेध घेता येणार नाही . शिक्षणाच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी सामाजिक परिवर्तन होत असताना शिक्षण हा एक जगण्याचा केंद्रबिंदू ठरावा, त्यातून समाज निर्मितीला पाठबळ मिळेल असे माजी शिक्षण आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी सांगितले.
यावेळी सपकाळ नॉलेज हब अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ डॉ.कल्याणी सपकाळ , सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साखरशेठ कांकरिया, लोकशिक्षण मंडळाचे राजेंद्र गडाख , आचार्य महादेव कोकाटे, विलास पोद्दार, कवी -अरुण इंगळे आदी उपस्थित होते. प्रा डॉ भागवत महाले यांना गिराणा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे, पदाधिकारी शिक्षणाधिकारी , प्राचार्य , मित्र परिवार आदींनी अभिनंदन केले आहे. सूत्रसंचालन प्रा. राजेश्वर शेळके यांनी करुन आभार यांनी मानले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले .मो ८२०८१८०५१०
