गोखले फार्मसी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांत घवघवीत यश
फार्मा वर्किंग मॉडेल व प्रश्नमंजुषा स्पर्धेत केले उल्लेखनीय प्रदर्शन
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि 15 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिकरोड,ता.15 ( प्रतिनिधी:संदीप पुरकर):- कॉलेज रोड, नाशिक: गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील व विविध विद्यापीठस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. द्वितीय वर्ष बी.फार्मच्या मानसी मुनोत, गार्गी कुलकर्णी आणि प्रांजल चौधरी यांनी राष्ट्रीय स्तरावरील फार्मा वर्किंग मॉडेल स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे यांच्या विद्यमाने ३० सप्टेंबर रोजी ऑनलाईन स्वरूपात आयोजित या स्पर्धेत त्यांनी ‘बॉल मिल’ मॉडेल सादर केले. बॉल मिल एक प्रकारचा ग्राइंडर आहे, जो मोठ्या प्रमाणात सामग्री क्यूडी/नॅनोसाइजमध्ये पीसण्यासाठी वापरला जातो. त्यांच्या सादरीकरणामुळे तिसऱ्या क्रमांकाचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख ₹५००० चे बक्षीस मिळाले. या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. सुनिल अमृतकार आणि मार्गदर्शक उन्मेश भामरे यांच्या मार्गदर्शनाला जाते.
तसेच, विद्यापीठस्तरावरील ‘जल्लोष’ स्पर्धेत, कु. प्रकाश मुळेवा, विवेक पाटील (अंतिम वर्ष बी.फार्मसी) आणि सर्वेश मोरानकर (द्वितीय वर्ष बी.फार्मसी) यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला. ही स्पर्धा संगमनेर येथील मालपाणी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यात प्रा. स्मिता शेळके यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे, प्रकल्प संचालक श्री. पी. एम. देशपांडे, आस्थापना संचालक श्री. शैलेश गोसावी, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पिंगळे, तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
.
✮ दिव्य भारत BSM NEWS, जाहिरात संपर्क- ९१. ८२०८१८०५१० ✮ पत्रकार व जाहिरातदार- सुभान शेख, येडशी. मो
✮ दिव्य भारत BSM NEWS, जाहिरात संपर्क- ९१. ८२०८१८०५१० ✮ पत्रकार व जाहिरातदार- सुभान शेख, येडशी. मो (1)
अमोल मुंढे
✮ दिव्य भारत BSM NEWS, जाहिरात संपर्क- ९१. ८२०८१८०५१० ✮ पत्रकार व जाहिरातदार- सुभान शेख, येडशी. मो (2)
दिव्य भारत बी एस एम न्यूज दिपालीवालीच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्य भारत बी एस एम न्यूज दिपालीवालीच्या हार्दिक शुभेच्छा
5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
012364