





बिटको महाविद्यालयात भारतेंदु हरिश्चंद्र जयंती साजरी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 16 सप्टेंबर 2024
β⇔नाशिकरोड,दि.16 (प्रतिनिधी:संजय परमसागर):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदु हरिश्चंद्र यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रा.डॉ.संतोष पगार यांनी ‘हिंदी साहित्य के युग प्रवर्तक : भारतेंदु हरिश्चन्द्र’ या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतेंदू हरिश्चंद्र यांनी हिंदी भाषा व साहित्य विकासासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांनी हिंदी नाट्य वाङ्मयाला नवीन स्वरूप दिले. सामाजिक पौराणिक, ऐतिहासिक अशी सर्व नाटके त्यांनी लिहुन साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी केली असे सांगितले. प्रारंभी भारतेंदु हरिश्चंद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी टी.वाय.बी.ए. हिंदी विषयातून प्रथम आलेल्या कु.सीमी चांडालिया या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रा.डॉ.सागर चौधरी, प्रा.डॉ.संदीप तपासे, प्रा. चंद्रकांत तारू व हिंदी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )