β : नाशिक :⇔आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व 15 जागा स्वबळावर लढवून जिंकण्याचा, वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व 15 जागा स्वबळावर लढवून जिंकण्याचा, वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व 15 जागा स्वबळावर लढवून जिंकण्याचा, वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 21 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.21 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-नाशिक येथील शालिमार “आय एम ए ” या हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली, बैठकीत विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवून आघाडीची ताकद दाखवून देऊ असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सर्व मतदारसंघांमध्ये सक्षम उमेदवार देण्यात येणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले .
आघाडीची बलस्थाने व रचना यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करून कायींच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आल्या. प्रत्येक मतदारसंघात मतदाराच्या घरी जाऊन, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. लोकांशी संवाद वाढवा, आघाडीचे विचारसरणी, ध्येय- धोरणे लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष वामन गायकवाड, महानगराध्यक्ष अविनाश शिंदे, संजय साबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल, विश्वनाथ भालेराव, युवक महाराष्ट्र सदस्य चेतन गांगुर्डे, युवक शहराध्यक्ष रवी पगारे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग शिंदे, बाळासाहेब शिंदे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष महिर गजबे, आदी या बैठकीला उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )