





“स्पर्धा परीक्षा : तयारी यशाची’ पुस्तकातून मार्गदर्शन व समुपदेशन”- ज्येष्ठ विचारवंत –अविनाश धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते शानदार प्रकाशन

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :मंगळवार : दि.9 एप्रिल 2024
β⇔नाशिक– दि.9(प्रतिनिधी : ब्रिजकुमार परिहार) : ‘स्पर्धा परीक्षा : दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरेल. अशी ग्वाही या पुस्तकाचे लेखक व प्रकाशक ब्रिजकुमार परिहार यांनी दिली. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या दिमाखदार पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोदर मावजो प्रमुख पाहुणे होते. तर सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ अध्यक्षस्थानी होते. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. परिहार यांनी पूस्तकाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षा हा शासकीय सेवेत जाण्याचा राजमार्ग आहे. परंतु त्याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, देशप्रेम, तसेच व्यवस्था व संविधान याबाबत संपूर्ण ज्ञानही हवे असते. तसेच अवांतर वाचनासारख्या चांगल्या सवयीसुध्दा महत्वाच्या ठरतात. अशी परिपुर्ण तयारी कशी करावी?, क्लास लावावा का? पालकांची भूमिका काय असावी? या क्षेत्रातील स्पर्धेकडे कसे पहाल? यासारख्या असंख्य प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न या पूस्तकाद्वारे केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तन्मय प्रकाशनची निर्मिती असलेल्या या पुस्तकासाठी 9011374300 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही परिहार यांनी केले. यावेळी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, प्रा. डॉ. गिरीश पाटील, त्रिपुरा येथील मोटिवेशनल स्पीकर अशपाक पटेल, नितीन पाटील, दिगंबर काकड, स्वराज आंदोलनचे संपादक सुखदेव भालेराव आदी उपस्थित होते.
नाशिक : तन्मय प्रकाशनच्या ‘स्पर्धा परीक्षा : तयारी यशाची’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ, ज्ञानपीठ विजेते साहित्यिक डॉ. दामोदर मावजो, लेखक ब्रिजकुमार परिहार आदी.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510