





भारतीय हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे निधन
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक : गुरुवार : दि २८ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिक ,ता.27 ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):– भारतीय हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे ९८ वर्षी निधन झाले . भारत देशाला भुकेपासून मुक्त करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि आज देशाचा अन्नाचा तुटवडा कमी झाला आहे. त्याचं निःसंशयपणे श्रेय स्वामिनाथन ह्यांना जातं. शेती जनुकशास्त्र आणि ग्रामीण अर्थशास्त्र ह्यावर त्यांचं मूलभूत चिंतन होतं. स्वातंत्र्यानंतर एका महिन्यांत दिल्लीला स्वामीनाथन आले. त्यावेळेला त्यांनी दिल्ली स्टेशनातच फाळणीचा हिंसाचार पाहिला होता, बहुदा तिथेच त्यांना दुःख निवारणाची प्रेरणा मिळाली असावी.दारिद्रय आणि भूक ह्या दुःखाच्या दोन चेहऱ्यांशी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. तांदळाच्या वाढीव उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. एम.एस.स्वामीनाथन यांनी रिसर्च फाउंडेशनची स्थापना करीत त्यांनी गव्हाचे उच्च उत्पन्न देणारे बियाणे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
१९८७ मध्ये त्यांना पहिल्या जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.१९७१ मध्ये रामन मॅगसेसे पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी त्यांच्या हयातीत झालीच नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आज हवामानबदलामुळे शेतीपुढील आव्हानं गंभीर आहेत.शेती करावी का ? आणि केली तर का करावी ? असं वैफल्य शेतकऱ्यांच्या मनात दाटून येत असताना स्वामीनाथन ह्यांच्यासारखा द्रष्टा ह्या जगात नाही, हे खूप वाईट आहे.अर्थात स्वामीनाथन ह्यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाचा अहवाल आजपर्यंत भारतात कुठल्याही सरकारांनी स्वीकारला नाही ,हे दुर्दैव आहे. हा अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबाजवणी करणे ,हीच स्वामीनाथन ह्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०