





खोखो विश्वचषकात भारताचा डबल धमाका – महिला आणि पुरुष संघांनी पटकावले विश्वविजेतेपद
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.20 जानवरी 2025
β⇔नाशिक,ता.20(प्रतिनिधी: शाश्वत महाले ):- पहिल्या खोखो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी शानदार कामगिरी केली आणि दोन्ही संघांनी विश्वविजेतेपद पटकावून इतिहास रचला. या अभूतपूर्व यशामुळे भारताच्या खेळाडूंना गौरव प्राप्त झाला असून, देशवासीयांसाठी हे एक अभिमानास्पद क्षण ठरले आहेत.
महिला आणि पुरुष संघांच्या एकत्रित यशाने भारतीय खोखो खेळाडूंसाठी प्रेरणादायी संदेश दिला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे देशातील इतर खेळाडूंना देखील त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत नवा उत्साह आणि प्रेरणा मिळेल.
भारताच्या दोन्ही विश्वविजयी खोखो संघांचे मनःपूर्वक अभिनंदन, तसेच खोखो खेळातील त्यांची भावी कारकीर्द सुखद आणि यशस्वी होईल, अशी हार्दिक शुभेच्छा.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )