β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.26 जानेवारी, 2024
β⇔नागपूर, दि.26
β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस – ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार)2प्रजासत्ताक दिन म्हणजेच स्वतंत्र भारताची नियमावली
:-२६ जानेवारी संविधानाचा व नियमांचा आधारस्तंभ आहे.१५ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.परंतु स्वातंत्र्यानंतर संविधान, देशाची नियमावली असने गरजेचे असते.कारण कोणत्याही कार्याकरीता पुढे पाऊल टाकण्यास कायद्याच बंधन असने गरजेचे आहे.२६ जानेवारी१९५० रोजी देशाची राज्यघटना लागु झाली.त्यानिमित्याने भारतातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो.कारण प्रजासत्ताक म्हणजे लोकांव्दारे लोकांसाठी शासन. भारतात जात,धर्म,पंथ,वंश,गरीब-श्रीमंत, व्देष या संपूर्ण गोष्टी बाजूला ठेवून गुन्या-गोविंदाने प्रजासत्ताक दिवस वेगवेगळ्या संस्कृतीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
२६ जानेवारी१९५० रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची लॉर्ड माउंट बॅटन(गव्हर्नर जनरल) यांच्या जागी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली.२६ जानेवारीच्या निमित्ताने दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीतील राजपथावर राष्ट्रध्वज फडकवला जातो.आपण ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत.मुख्यत्वे करून २६ जानेवारीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना लागु करण्यात आली. त्यामुळे स्वतंत्र भारतासाठी हा मोठा आणि गौरवाचा दिवस मानल्या जातो.भारताला स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झाली असली तरीही आजही देशात आपल्याला गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बॅंक घोटाळे,झुंड बळी, जातीयवाद, हिंसाचार, यांच्याशी आजही आपण लढतोय ही स्वतंत्र भारतासाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.अशा गुन्ह्या विरूद्ध सरकारने व राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. कारण देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, लाला लजपतराय, इत्यादीसह लाखो स्वतंत्र शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.तेव्हाच १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उदयास आला.भारताच्या थोर महात्म्यांना भारत स्वतंत्र करण्यासाठी दोन नद्यांचा उगम झाला एक मवाळवादी तर दुसरी जहालवालवादी यांच्या संगमानेच भारतीय स्वातंत्र्यलढा उभा झाला. याकरिता आपल्याला १५ ऑगस्ट१९४७ उजाडण्यासाठी तब्बल १५० वर्षे लागली.१५० वर्षांच्या काळातील स्वतंत्र विरांचे बलीदान व्यर्थ जावु नये व त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अस्तित्वात आणली.यात मुख्यत्वेकरून डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल,पंडित जवाहरलाल नेहरूसह अनेक थोर महात्म्यांचा सिंहाचा वाटा आहे.परंतु दु:खाची गोष्ट म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून देशात भ्रष्टाचार,करोडोचे घोटाळे, बलात्कार, निवडणुकांमध्ये जातीयवाद याला मोठ्या प्रमाणात उत आल्याचे पहायला मिळते.ही शहिद विरांच्याप्रती अत्यंत दु:खद व चिंताजनक बाब आहे. आपल्या पुर्वजांनी व देशाच्या स्वतंत्र संग्राम सेनानींनी आणि बहादुर विरांनी घर-दार, परीवार या संपूर्ण गोष्टी बाजूला सारून व त्याग करून स्वातंत्र्याच्या अग्नी कुंडात उडी घेतली व लाखोंच्या संख्येने बलीदान दिले. परंतु आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल की आपण भारत स्वतंत्र होऊन ७७ व्या वर्षीत पदार्पण करीत आहोत तरीही भारतातील भ्रष्टाचार थांबलेला नाही.आज भारतातील राजकीय पुढाऱ्यांजवळ, पुंजीपतीं,वॉलीउडक्षेत्र व भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांजवळ वाममार्गाने कमवीलेली करोडोंची संपत्ती आजही आहे. ही संपत्ती एकत्र केली तर भारताला तब्बल १० वर्षे कोणाही जवळुन कर्ज घ्यावे लागणार नाही व गरीबी संपुष्टात येवु शकते आणि देश सुजलाम-सुफलाम होण्यास मोठी मदत मिळेल.याकरिता भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकीय पुढारी ही देशाला लागलेली कीड आहे ही कीड जळामुळासकट नष्ट व्हायला हवी व यावर आळा बसायला हवा.
आज मुठभर राजकीय पुढाऱ्यांनी करोडो रुपयांची चल-अचल संपत्ती दाबुन ठेवल्याने व चलनात नसल्याने देशातील गरीब वर्ग गरीबांच्या खाईत जात आहे तर श्रीमंत वर्ग श्रीमंत होत आहे व देशाच्या विकासामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे.यामुळेच देशात महागाई व बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दिसून येते.भारताचे प्रजासत्ताक दिनाचे ७४ व्या वर्षाचे औचित्य साधून देशातील संपूर्ण भ्रष्टाचाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यांनी वाममार्गाने कमवीलेला पैसा सरकारने आपल्या तिजोरीत जमा करावा.यामुळे देशाचा विकास, बेरोजगारीची समस्या, महागाई यावर आळा घालण्यासाठी मोठी मदत होईल व देश भरभराटीला येईल.याचे स्वागत आपले पुर्वज,शहीद व स्वतंत्र सेनानी अवश्य करेल व त्यांच्या स्वतंत्र लढ्याला दिलासा अवश्य मिळेल हीच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहिदांना आदरांजली ठरेल.देशात वाढते प्रदूषण व ग्लोबल वार्मिंगचा धोका पहाता.प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला हवी.याकरीता शाळा, कॉलेज, संपूर्ण सरकारी क्षेत्र, राजकीय पुढारी, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घ्यायला हवा.यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल व प्रदूषणावर मात करण्यासाठी मोठी मदत मिळेल.भारतीय शहिदांची व शुरविरांची गाथा अबाध्य आहे.त्यांच्या आशीर्वादानेच आपण आज मोकळा श्वास घेत आहोत.जय हिंद! लेखक :– रमेश कृष्णराव लांजेवार (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९,नागपूर
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो. ८२०८१८०५१०
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)