Breaking
क्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

β :अहमदाबाद :⇔ ”भारत – आस्ट्रेलिया”  फायनल मॅच रविवारी , वर्ल्ड कप 2023 क्रिकेट प्रेमिंची उत्सुकता शिगेला- ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

β :अहमदाबाद :⇔ ''भारत - आस्ट्रेलिया''  फायनल मॅच रविवारी , वर्ल्ड कप 2023 क्रिकेट प्रेमिंची उत्सुकता शिगेला- ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

0 0 2 5 6 2

”भारत – आस्ट्रेलिया”  फायनल मॅच रविवारी , वर्ल्ड कप 2023 क्रिकेट प्रेमिंची उत्सुकता शिगेला …..

β :अहमदाबाद :⇔ ''भारत - आस्ट्रेलिया''  फायनल मॅच रविवारी , वर्ल्ड कप 2023 क्रिकेट प्रेमिंची उत्सुकता शिगेला- ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )
β :अहमदाबाद :⇔ ”भारत – आस्ट्रेलिया”  फायनल मॅच रविवारी , वर्ल्ड कप 2023 क्रिकेट प्रेमिंची उत्सुकता शिगेला- ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  : नाशिक  : शनिवार : दि 18 नोव्हेंबर 2023 

β⇔ अहमदाबाद : ता 18 ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :-  रोहित शर्मा अँड कंपनीच चॅलेंज वाढवणार ऑस्ट्रेलियाला यामुळे काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याआधी वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये अंपायरच जे पॅनल असेल, त्याबद्दल जाणून घ्या.वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये रिचर्ड कॅटलबरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ फील्ड अंपायर असतील. जॉय विल्सन थर्ड अंपायरच्या भूमिकेत असतील. क्रिस्टोफर जाफने थर्ड अंपायर असतील. एंडी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी असतील. तुम्ही म्हणाल अंपायरच्या या पॅनलच ऑस्ट्रेलियाच्या लकशी काय देणं-घेणं?. कनेक्शन आहे, कसं ते जाणून घ्या? उद्या भारत – आस्ट्रेलिया  फायनल मॅच अहमदाबाद येथे  दुपारी  2:00 वाजता नरेंद्र मोदी  स्टेडियम गुजरात मध्ये होत आहे, सर्व जगाचे लक्ष लागून आहे . 

ऑस्ट्रेलियाने तो-तो सामना जिंकलाय ;- रिचर्ड कॅटलबरो वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये फिल्ड अंपायर असतील. कॅटलबरो हे ऑस्ट्रेलियासाठी लकी ठरले आहेत. ICC टुर्नामेंटमध्ये ज्या कुठल्या मोठ्या मॅचमध्ये कॅटलबरो अंपायर होते. ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकलाय. 2015 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलपासून 2023 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल पर्यंत हेच होत आलय.

 2015 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये रिचर्ड कॅटलबरो अंपायर होते. त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलेलं. त्यानंतर त्याच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कॅटलबरोच अंपायर होते. त्यावेळी सुद्धा ऑस्ट्रेलियन टीम चॅम्पियन बनली. ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप फायनलचा किताब जिंकला. त्यावेळी सुद्धा रिचर्ड कॅटलबरोच अंपायर होते. इतकच नाही, परवा ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनलचा सामना 3 विकेटने जिंकला, त्यावेळी सुद्धा रिचर्ड कॅटलबरोच अंपायर होते.

  आता वर्ल्ड कप 2023 ची फायनल आहे. रिचर्ड कॅटलबरो या मॅचमध्येही फील्ड अंपायर आहेत. आता फक्त पहायच हे आहे की, ऑस्ट्रेलियासाठी लक फॅक्टर पुन्हा एकदा तसच काम करणार का?. सध्याच्या घडीला तरी टीम इंडिया तुफानसारखी भासतेय. हे तुफान रोखणं सोप नाहीय. फक्त टीम इंडियाला आपल्या परफॉर्मन्सने ऑस्ट्रेलियाच हे लक फॅक्टर निष्प्रभ कराव लागेल. मागच्या 9 वर्षात टीम इंडियाने जे नॉकआऊट सामने हरलेत, त्यात रिचर्ड कॅटलबरोच अंपायर होते.

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज  :  मुख्य संपादक : डॉ. भगवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 2

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!