





मेडसिंगा येथे तलाठी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 25 जून 2024
β⇔येडशी, दि. 25 (प्रतिनिधी : सुभान शेख) :-धाराशिव तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ. जाधव मॅडम,नायब तहसीलदार श्री. मुगावे व मंडळ अधिकारी श्री. डोके यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या मेडसिंगा सज्जाचे उद्घाटन मेडशिंगा ग्रामपंचायतचे सरपंच अनुरत दूधभाते व तलाठी एम.बी.गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे उपसरपंच किशोर आगळे , तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अनुरथ शीत्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मेडशिंगा गावचे प्रगतशील शेतकरी दत्ता रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य महेश लांडगे, कृषी समूह सहाय्यक रमण आगळे, ज्ञानदेव शित्रे, अजित शित्रे, विष्णू रणदिवे, गणेश (काजोल) शीत्रे, युवराज पाटील, विनोद आगळे , उद्धव घाडगे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
या पूर्वी मेडसिंगा गाव हे देवळाली सज्जा अंतर्गत येत होते. मात्र मागील वर्षी नव्याने निर्माण झालेल्या महसुली सज्जेत मेडसिंगा गावांसाठी स्वतंत्र सज्जा मंजूर करण्यात आला आहे. या सज्जा अंतर्गत सकनेवाडी हे गाव देण्यात आले असून कार्यालयाचे उद्घाटन गावात करण्यात आले. सज्जा कार्यालयामुळे गावातील नागरिकांना आपल्या कामासाठी गावातच सोय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)