जि.प.जऊळके शाळेत बहारदार हळदी, कुंकू कार्यक्रम संपन्न


β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि.4 फेब्रुवारी 2025
β⇔वणी ( दिंडोरी )दि.4 (प्रतिनिधी: रुतुजा तुपे ):- जिल्हा परिषद शाळा जऊळके वणी येथे हळदी-कुंकू स
मारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व महिला- पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दिनांक 4/2/ 2025 रोजी जिल्हा परिषद शाळेत,शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमार्फत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर हळदी- कुंकू समारंभ पार पडलात्यानंतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. त्यामध्ये बॉटल भरणे, मनोरा तयार करणे, टंग ट्विस्टर, संगीत खुर्ची यांसारखे खेळ घेण्यात आले तसेच विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आले.
आपली आई पण स्पर्धेत सहभागी होते, जिंकण्यासाठी धडपड करते व जिंकून बक्षीस पण मिळवते ह्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी खूपच प्रेरणादायी असतात आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा आमचा उद्देश सफल झाला. या कार्यक्रमासाठी श्रीमती बोरसे मॅडम, श्रीमती केंद्र मॅडम, श्रीमती पगारे मॅडम व पूजा जगताप,कांचन बोंबले यांचे सहकार्य लाभले.
-
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा