वडाळा (जि.नाशिक) गावात एका घरावर छापा टाकून 20 किलो गांजा जप्त , गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 29 मे 2024
β⇔नाशिक, दि.29 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नाशिक जिल्ह्यातील वडाळा गावातून नाशिक शहरात गांजाची छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती युनिट १चे हवालदार मुक्तार शेख यांना मिळाली होती शाहरुख शहा रफिक शहा( वय 29 रा. ए – आठ महाडा वसाहत बिल्डिंग, वडाळा गाव मूळ रा. मेहबूबनगर ,नाशिक असे गांजाचा साठा करून विक्री करणाऱ्या संशयताचे नाव आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे व युनीट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या निर्देशानुसार पथकाने काल सायंकाळी पाच वाजता शहा यांच्या घरावर छापा मारून त्याच्याकडून 4:15 लाख रुपयाचा ओलसर गांजा व एक मोबाईल असा चार लाख 31 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहा याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास उपनिरीक्षक बि.डी. सोनार करत आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )