‘जल जीवन मिशन’ जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कुमारी संचिता कांडेकर प्रथम
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 13 मार्च 2024
β⇔सायखेडा, दि.13 (प्रतिनिधी : राजेंद्र कदम ):-पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती निफाड संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल जीवन मिशन ‘अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत ” जलजीवन मिशन व माझ्या गावाचा विकास” या विषयावर निबंध सादरीकरण करण्यात आले.
सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी संचिता संपत कांडेकर हिने नाशिक जिल्ह्यात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे. तिचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे (नाशिक) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व 21 हजार रुपये पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला . नृत्य कला, गायन शाळाबाह्य स्पर्धा यात नेहमीच भाग घेतलेला आहे . तिला तिचे वडील संपत कांडेकर , प्रा. सौ चित्रा कांडेकर, वृषाली शिंदे वधूत आवारे, प्रतीक्षा शिंदे , संजय बोरगुडे ,संजय भोई यांचे मार्गदर्शन लाभले .
मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे ,सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी ,निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज, शालेय समितीचे अध्यक्ष विजय कारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष जगन्नाथ डेरले, मविप्रचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ. भास्कर ढोके, शिक्षण शालेय समिती सदस्य संजय कांडेकर ,प्राचार्य नवनाथ निकम, उप मुख्याध्यापक शरद शेळके पर्यवेक्षक श्रीराम ढोली, सर्व शालेय समिती सदस्य सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी त्यांचे कौतुक केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510