





“पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वाखाली “आशा” ताईंना ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा मिळणार लाभ” : डॉ. भारती पवार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 13 मार्च 2024
β⇔छत्रपती संभाजी नगर, दि.13 (प्रतिनिधी : नरेंद्र आहेर ):- छत्रपती संभाजी नगर येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत आशा सेविका मेळावा संपन्न झाला.

मेळाव्या दरम्यान डॉ भारती पवार यांनी आशा भगिनींना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आशा सेविकांना 5 लाखांपर्यंत आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात आला आहे यावेळी डॉ भारती पवार यांनी भारत सरकारकडून त्यांच्यासाठी चालवल्या जात असलेल्या अनेक जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली.तसेच आशा स्वयंसेविकांच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नक्कीच प्रयत्नशील आहे अशी ग्वाही डॉ भारती पवार यांनी दिली.
यावेळी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, शालिनी ताई बुंदे, अनिल मकरीये, दिलीप थोरात, जालिंदर शेंडगे, लक्ष्मीकांत थेटे, अमृता पालदकर,हर्षवर्धन कराड, मनीषा मुंडे, महेश माळवदकर,उज्वला दहिफळे, कचरू घोडके सह मोठ्या प्रमाणात आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510