





महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न
राज्यभरातुन 600हुन अधिक महिला कुस्तीपटुंचा सहभाग

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक: रविवार : दि १० डिसेंबर 2023
β⇔चंद्रपूर, ता.10 ( प्रतिनिधी : खास ) :- ग्रामीण महिला कुस्तीपटुंना वाव मिळावा याकरिता शिक्षणाची पंढरी असलेल्या ब्रम्हपुरी नगरीत जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याकुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते थाटात सोहळा पार पडला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजूरकर, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सौ. किरण विजय वडेट्टीवार, नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नंदु नागरकर, प्रवीण पडवेकर, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद टेकुलवार, कुस्तीगीर संघाचे सचिव मुर्लीधर टेकुलवार, विजय नडे, मतीन कुरेशी, राजेश सोलापन, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, गजानन शिरसागर, चंद्रशेखर पडगिलवार, नरेंद्र गाडगिलवार, विनोद दिवटे, चंद्रशेखर पडगिलवार आदि मान्यवर उपस्थित होते .
ग्रामीण महिला कुस्तीपटुंना संधी व प्रोत्साहन मिळावे या हेतूने आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून 600हुन अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला आहे. तर देशाच्या पारंपारिक क्रिडांपैकी एक असलेल्या कुस्ती स्पर्धेत कौशल्याची छाप सोडणाऱ्या विजेत्यांना राष्ट्रीय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून महिलांचे सक्षमीकरण व्हावे, हा यामागील मुळ हेतू असुन जिल्ह्यात शिक्षणाची पंढरी व वैद्यकीय नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी नगरीला नावलौकिक मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी कटीबध्द आहोत.

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज: मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०