





आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र बंदच – वरिष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि.16 फेब्रुवारी 2025
β⇔जवळे(धाराशिव )दि.16 (प्रतिनिधी: प्रकाश सोनार ):- धाराशिव तालुक्यातील मौजे जवळे दु. येथील ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र मागील पाच-सहा वर्षांपासून बंद असल्याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचेकडे वारंवार तक्रार व पाठपुरावा करुनही वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याची तक्रार जवळे दु. येथील नागरिक श्री. प्रकाश गणपती सोनार यांनी उपजिल्हाधिकारी धाराशिव यांचे कडे केली आहे.
मागील वर्षी जुलै व डिसेंबरमध्ये उपजिल्हाधिकारी यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन वेळा पत्रे देऊन आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करण्याचे आदेश दिले, असतानाही अद्याप कोणतीही चौकशी वा कार्यवाही केली नाही. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य असुन शासनाच्या कार्यालयीन व्यवस्थापन व कार्यपद्धतीनुसार कार्यवाही न केल्यामुळे श्री.प्रकाश सोनार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष चौकशी समितीची नेमणूक करुन ग्रामपंचायत अधिकारी,आपले सरकार सेवा केंद्राचे समन्वयक,पंचायत समिती व जिल्हा परिषदचे अधिकारी या साखळीची सखोल चौकशी करावी, योग्य कार्यवाही करण्याची मागणी श्री.प्रकाश सोनार व ग्रामस्थांनी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )