गोखले फार्मसी महाविद्यालयाची उत्कृष्ट यशाची परंपरा कायम …!
१२० पैकी महाविद्यालयातील ९५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह , तर १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत …!
β⇒ दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : नाशिक प्रतिनिधी : दीपाली भंडारी
β⇒ नाशिक, ता. ७ ( दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज वृत्तसेवा ) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तर्फे घेण्यात आलेल्या बी. फार्मसी उन्हाळी सत्रांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात गोखले एजुकेशन सोसायटी संचलित सर डॉ. मो. स.गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष बी.फार्मच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष बी. फार्मसीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून १२० पैकी महाविद्यालयातील ९५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यात प्रथम क्रमांक कु. आयुषी ठक्कर व वाघ जुई ९.०१ सीजीपीए गुण, द्वितीय क्रमांक नेहा भंडारे ८.९७१ सीजीपीए , तृतीय क्रमांक उगले उज्ज्वला ८.७७६ सीजीपीए , वेताळ निकिता ८.७५७ सीजीपीए , कावळे वैष्णवी ८.६९ सीजीपीए असे गुण मिळविले आहेत.
गोखले एजुकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या सर्वच शाळा व महाविद्यालये यांनी शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ज्ञान व निकाल देऊन आपली आगळी-वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.गोखले फार्मसी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायमस्वरूपी संलग्न असून महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या संख्येने नायपर (चंडीगड ),आयसीटी (मुंबई ),बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU),यासारख्या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहेत, अनेक विद्यार्थी औषधनिर्माण क्षेत्रातील औद्योगिक,शैक्षणिक व संशोधन विभागात देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत. या वेळी नवनिर्वाचित सचिव व संस्थेच्या मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे, प्रकल्प संचालक पी.एम.देशपांडे, आस्थापना संचालक श्री. शैलेश गोसावी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. अमृतकर, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पिंगळे, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉ.धनश्री माळी यांनी सर्व यशस्वीतांचे अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
β⇒ दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले, मो . ८२०८१८०५१०
β⇒ नाशिक : गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिवपदी प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे :मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज