Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशनोकरीब्रेकिंग

β : नागपूर :⇔जंगलतोड व वाढत्या प्रदुषणामुळे वन्यजीव धोक्याच्या उंबरठ्यावर-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार )

β : नागपूर :⇔जंगलतोड व वाढत्या प्रदुषणामुळे वन्यजीव धोक्याच्या उंबरठ्यावर-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार )

018491

जंगलतोड व वाढत्या प्रदुषणामुळे वन्यजीव धोक्याच्या उंबरठ्यावर : रमेश लांजेवार 

β : अकोले :⇔"आदिवासी जीवन,जंगली संपदा,रानमेवा,दिर्घायुष्यासाठी वरदान ! दुर्मिळ वनसंपदा संवर्धन काळाची गरज"(प्रतिनिधी:अर्जुन तळपाडे)
β ::β : नागपूर :⇔जंगलतोड व वाढत्या प्रदुषणामुळे वन्यजीव धोक्याच्या उंबरठ्यावर-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिकशनीवार : दि, 02 मार्च 2024

β⇔नागपूर : दि,2(प्रतिनिधी : रमेश लांजेवार ):- वन्यजीव वाचविण्यासाठी पृथ्वीचे व निसर्ग सृष्टीचे रक्षण आवश्यक २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ६८ व्या अधिवेशनात  दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु खरंतर, ३ मार्च १९७३ रोजी वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन (सीआयटीईएस) सुरु झाले होते.त्यावेळेस जगातिल जंगलातील प्राणी आणि वनस्पती याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी थायलंडने प्रस्तावित केले होते.परंतु २० डिसेंबर २०१३ ला प्राण्यांच्या रक्षणासाठी अधिकृतपणे दरवर्षी ३ मार्चला “जागतिक वन्यजीव दिवस” साजरा करण्याचे जाहीर झाले. तेव्हा पासून ३ मार्च जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात येतो.

              या मागचा उद्देश म्हणजे जंगलातील प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणकोणते उपाय योजले जाऊ शकतात यासाठी दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात येतो. पृथ्वीचा दीवसेंदीवस ह्रास होत आहे. यामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी होत असुन जंगलातील प्राणीमात्रांवर व वनस्पतीवर विपरीत परिणाम होतांना दिसतो.याकरीता पृथ्वीला  वाचवाण्यासाठी सर्वांनी “संकल्प”करण्याची गरज आहे.कारण पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीचे रक्षण व्हायलाच हवे.सध्याच्या परीस्थितीत जगातील वाढती लोकसंख्या पृथ्वीतलावरील मोठे संकट आहे.यामुळे हवेतील ऑक्सिजनची मात्रा कमी होतांना दिसुन येते.कारण जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलसंपदा छीन्न-विछीन्न झाल्याचे दीसुन येते.त्याचप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या प्रमाणात कारखाने दीसुन येतात.यामुळे संपूर्ण जगात स्थलप्रदुषण,वायुप्रदूषण व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होतांना दिसते.कारखाण्याचा विस्तार जगातील सर्वच देशांनी वाढविला आहे.यामुळे पहीला प्रहार जंगलसंपत्तीवर झालेला दिसुन येतो यामुळे वन्यजीव व वनस्पती धोक्याच्या उंबरठ्यावर दिसुन येते.याच कारणांमुळे आज पृथ्वीचे संतुलन डगमगतांना दीसुन येते.मानवाच्या अतिरेकामुळे पृथ्वीतलावरील भुकंप, ज्वालामुखीचा उद्रेक,सुनामी, महाप्रलय,महामारी,साथीचे रोग,अती पाउस,अती उष्णता,अती थंडी अशाप्रकारचे विनाशाकडे नेणाऱ्या घटना दीवसेंदीवस वाढतांना दीसत आहे व याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो आहे.

                       याचे मुख्य कारण म्हणजे जंगल संपदा नष्ट होने ह्या संपूर्ण घटना मानवाने पृथ्वीवर अत्याचार केल्यामुळे दीसुन येतात.याचे प्रायश्चित्त वन्यजीव प्राण्यांसोबत संपूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागत आहे. २१ व्या शतकात मानव इतका सामोरं गेला आहे की अनेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अत्याधुनिक हतियार बनविण्याच्या शर्यती लागलेला आहेत.आतातर “बायोवेपन्स” म्हणजे जैविक हतीयार बनविण्याची शर्यत लागली आहे.यामुळे पृथ्वी “तहस-नहस” होवू शकते आणि याचा पहिला प्रहार जंगलसंपदावर होतांना दिसतो.आज मानवाने जंगल संपत्तीची हत्या केल्यामुळे नदी,तलाव, विहिरी मोठ्या प्रमाणात आटलेले दीसतात.यामुळे जंगलातील प्राणीमात्रांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.याकरीता जगातील संपूर्ण देशांनी प्राण्यांसाठी पाणवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे पृथ्वीच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसते आणि ग्लोबल वॉर्मिगमुळे सुध्दा पृथ्वीचे संतुलन डगमगायला लागले आहे.पृथ्वीवरील जंगलसंपदा कमी झाल्यामुळे व छोटे-मोठे तलाव आटल्यामुळे हिंसक पशु व जंगलातील इतर पशू (वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण,बंदर) यांना जंगलात योग्य आहार व पाणी मिळत नसल्यामुळे शहराकडे धाव घेतांना दीसतात हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे यावर जागतिक पातळीवर अभ्यास व्हायला हवा.अशा अनेक कारणांमुळे पृथ्वीचा ह्रास होत आहे व जंगली प्राण्यांचा जिवन धोक्यात आलेले आहे.यावर उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक योजना राबविल्या जातात.

                    आज जगात २०० हुन अधिक देश आहेत या देशांच्या तुलनेत लोकसंख्येचा विचार केला तर १००० कोटींच्या वर लोकसंख्या आहे.त्यामुळे संपूर्ण देशांनी पृथ्वीला वाचविण्याच्या उद्देशाने ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावायला पाहिजे.कारण नैसर्गिक ऑक्सिजन टिकवून ठेवण्यासाठी जंगल वाचवीले पाहिजे, वृक्षारोपण केले पाहिजे आणि पृथ्वीला वाचविले पाहिजे.त्याचप्रमाणे जंगल तोडीमुळे जंगलातील प्राणी शहराकडे भटकतात त्यांच्यासाठी जगातील संपूर्ण देशांनी जंगलामध्ये छोटे-छोटे तलाव बांधुन जंगली प्राण्यांचे प्राण वाचवुन संगोपन करायला पाहिजे.कारण मानवाच्या अनेक चुकांमुळे अनेक जंगली पशु-पक्षी व महत्त्वपूर्ण औषधीयुक्त वृक्ष लुप्त होत आहे.या पृथ्वीतलावर प्रत्येक प्राण्याचे व वृक्षांचे असने आवश्यक आहे.कारण प्रत्येक पशु-पक्षी एकमेकांवर अवलंबून असतो त्याचप्रमाणे प्रत्येक वृक्ष महत्वाची भुमिका बजावीत असते. जगातील “गिधाड” हा पक्षी अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावीत असतो.मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणे “गिधाड”चे काम असते.त्यामुळे तेथील परीसर शुद्ध होतो.परंतु दु:खाची बाब ही की वायुप्रदूषण व जलप्रदूषण यामुळे गिधाडांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.त्यामुळे पृथ्वीवर मानवजातीचे असने जेवढे महत्त्वाचे तेवढेच जंगलातील पशु-पक्षी व वनस्पती यांचे सुध्दा जिवन तेवढेच महत्त्वाचे आहे.तेव्हाच पृथ्वी सुरक्षीत राहील.मानवजातीने स्वत:च्या स्वार्थापोटी “पृथ्वीची राखरांगोळी” केली आहे.याचे पुढे चालुन महाभयानक परीणाम सर्वांनाच भोगावे लागतील आणि याचे परिणाम आपण करोना महामारीच्या रूपात भोगलेही आहे.आज मानवजातीने पुर्वेपासुन तर पश्र्चिम पर्यंत उत्तर पासुन तर दक्षिणे पर्यंत,आकाश-पाताळा या संपूर्ण ठीकाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचे जाळे पसरविले आहे.यामुळे आज “पृथ्वी माता” सुध्दा भयभीत आहे म्हणूनच आज आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे.याला वाचविण्याचे दायीत्व मानवाने स्वीकारले पाहिजे.

             आज मानवाची रक्षा करण्याकरीता पृथ्वीला वाचविण्याचा “संकल्प”जगातील संपूर्ण राष्ट्रांनी घ्यायला पाहिजे.आज वृक्षलागवडच पृथ्वीला वाचवु शकते.कारण आज जगात जंगलांचे संगोपन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात वनवे लागतांना दिसतात व यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल संपदा नष्ट होते व प्राणीमात्रांना आपले प्राण गमवावे लागते.त्याचप्रमाणे देशात व जगात दिवसेंदिवस आगीच्या सुध्दा घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे वाढते तापमान यामुळे पृथ्वीचे संतुलन डगमगत आहे हे नक्की.याला कुठेतरी थांबायला पाहिजे. वृक्ष लागवडीमुळे पावसाचे पाणी जमीनीमध्ये मुरेल व पावसाचे पाणी सरळ समुद्र किंवा नद्यामध्ये न जाता पृथ्वीच्या पोटात जाईल.यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत मिळेल व उष्णतेचे प्रमाण कमी होईल.यामुळे विहीरी,तलाव व नदी नेहमी जलमग्न राहील.आज मानवाने पाण्यासाठी सरळ पाताळात प्रवेश केला आहे.म्हणजेच आज मानवाने पाण्यासाठी जमिच्या आत ७०० फुट खोलवर जाऊन बोरवेलच्या सहाय्याने आपण देवलोकातील(पाताळातील) पाणी शोषीत आहोत.मानवाची जमीनीतील पाण्याची क्षमता फक्त ५० फुटांपर्यंत आहे.परंतु मानवाचा अतिरेक हा विध्वंसाकडे किंवा विनाशाकडे न्यायला काहीच वेळ लागणार नाही.कारण मानवाच्या हातात सर्वच काही आहे.परंतु मानवाने अजुन पर्यंत निसर्गावर नियंत्रण ठेवता आले नाही.नैसर्गिक आपदासमोर मानव नेहमी हतबल होतांना दिसतो.वनवा लागले, महाप्रलय येणे,हीमकडा कोसळने, उष्णतामान वाढने,भुकंप येणे,सुनामी येणे ह्या संपूर्ण गोष्टी मानवाने स्वत:हुन ओढवलेल्या आहेत.यामुळे जगात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिवीत हाणी व वित्तीय हानी होतांना आपण पहातो.पृथ्वी मानवजाती के लिये मेहमान है, मालक नहीं” ही बाब मानवांनी लक्षात ठेवली पाहिजे व पृथ्वीचे रक्षण करून संपूर्ण जीवसृष्टीला वाचवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजे.वन्यजीव दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना आग्रह करतो की  नैसर्गिक ऑक्सिजन, प्राणीमात्रांना चारा, प्राणांचे संरक्षण यासाठी जंगल तोड थांबवा व मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीवर भर द्या.यामुळे “गुरांना चारा व सर्वांना शुद्ध हवा आणि शुद्ध ऑक्सिजन” मिळेल.
लेखक :-
  β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस - ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)

β : नागपूर :⇔ जगाला पर्यावरण संरक्षणाची नितांत गरज, 26 नोव्हेंबर विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस – ( प्रतिनिधी : रमेश  लांजेवार)

       रमेश कृष्णराव लांजेवार  
      (माजि विद्यापिठ प्रतिनिधी, नागपूर  मो.नं.९९२१६९०७७९)                   

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले मो. 8208180510

टिप :-(लेखकाच्या बातमी अथवा  मजकुराशी संपादक मंडळ सहमत असतीलच असे नाही , हे विचार संबंधित लेखकाचे आहेत.)

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!