





पं. आनंद भाटे यांच्या सुश्राव्य मैफिलीतून सर डॉ. मो.स. गोसावी यांना भावांजली
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि .१७ सप्टेंबर २०२३
नाशिक , ता १७ ( प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी ) :- येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम.आर.के.बी.के.ए.के. महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे सर डॉ.मो.स. गोसावी संगीत महोत्सव आज पं. आनंद भाटे ह्यांच्या नाट्य गीत व अभंगांच्या गायनाने संस्थेच्या गुरुदक्षिणा हॉल मध्ये संपन्न झाला. ह्या प्रसंगी संस्थेच्या सचिव व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. सौ. नीलम बोकिल ह्यांनी सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संगीत महोत्सवाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. पं. आनंद भाटेंचा परिचय करून दिला. ह्यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे , विभागीय सचिव प्रा. डॉ. राम कुलकर्णी , संस्थेचे विश्वस्त व सह खजिनदार, प्रा. डॉ. आर .पी. देशपांडे, विशेष अतिथी प्रा जयंत भातांबरेकर , सौ. भातांबरेकर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सौ. कविता पाटील, डॉ. सौ. नीलम बोकिल उपस्थित होते.
याप्रसंगी ‘प्लॅटिनम ‘ ह्या श्रीवर्धन महाविद्यालयाच्या विज्ञान, कला , वाणिज्य विषयावरच्या ह्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. आपल्या मनोगतात प्रा. डॉ. भांतांबरेकर सर ह्यांनी आदरणीय सर डॉ. मो. स. गोसावी सर व संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. तसेच त्यानी संस्थेला गुरूदाक्षिणा म्हणून ११ लाखाची देणगी दिली . प्रसंगी ‘ज्ञानादित्य’ ह्या महाविद्यालयाने संपादित केलेल्या सर डॉ. मो.स. गोसावी सरांच्या स्मृती ग्रंथांचे प्रकाशन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध गायक पं. आनंद भाटे ह्यांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ.सौ.दीप्ती देशपांडे ह्यांनी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान व्यक्त करताना त्या म्हणाल्या की त्यांच्या बहुमूल्य कार्याच्या बळावर समाज पुढे प्रगती करणार आहे. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सौ. आश्लेषा कुलकर्णी ह्यांनी केले.
आपल्या संगीत मैफिलीची सुरवात पं. I आनंद भाटे ह्यांनी संगीत शांकुतल नाटकाच्या नांदीने केले. सं. स्वयंवर मधील नाथ हा माझा, सं. मानापमान मधील, दे हाता शरणागता , कट्यार काळजात घुसली नाटकातील, पं. जितेंद्र अभिषेकीं चे मुरलीधर शाम हे नंदलाल , संगीत सौभद्र मधील वद जाऊ कुणाला शरण अशा नाट्यगीतांतून व प्रसिद्ध अभंगा च्या सुश्राव्य गायनातून व रसिक श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून मधून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. श्रोत्यांच्या चिरस्मरणात राहिल असा कार्यक्रम पं. आनंद भाटे ह्यांनी सादर केला. याप्रसंगी गोसावी व देशपांडे परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी , विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित .
दिव्य भारत बी एस एम न्यूज मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
