





महिला महाविद्यालयात “न्यूट्रिशनचे महत्व” या विषयावर व्याख्यान संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 17 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक (शहर), दि.17 (प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- येथील एस. एम. आर. के. बी.के. एके. महिला महाविद्यालयात “न्यूट्रिशनचे महत्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वेलनेस कोच सावन देवरे व पुनम देवरे यांनी यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाढते प्रदूषण, अन्नामध्ये असलेली भेसळ तसेच कीटकनाशके यांचा अतिरीक्त वापर यामुळे अन्नातील पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
आजच्या युवा पिढीमध्ये लठ्ठपणा व वजन वाढणे या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात ज्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते, याविषयी त्यांनी स्वतःचे अनुभव देखील सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व विद्यार्थिनींना आहाराचे महत्त्वा विषयी सांगितले. सुरुवातीला मैथिली लाखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर शोभा त्रिभुवन यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर नितीन सोनगिरकर सौ छाया लोखंडे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . संध्या खेडेकर , उपप्राचार्य डॉ . नितीन सोनागिरकर , प्रमुख वक्ते सावन देवरे , पुनम देवरे , मैथिली लाखे , शोभा त्रिभुवन दिसत आहेत .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )