Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिक :⇔ गोखले शिक्षण संस्था ही नव्या आव्हानांना सामोरी जाणारी, अग्रगण्य शिक्षण संस्था आहे-डॉ. मिलिंद निकुंभ – (प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे-गिरी )

β : नाशिक :⇔ गोखले शिक्षण संस्था ही नव्या आव्हानांना सामोरी जाणारी, अग्रगण्य शिक्षण संस्था आहे-डॉ. मिलिंद निकुंभ - (प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे-गिरी )

0 0 2 8 6 4

गोखले शिक्षण संस्था ही नव्या आव्हानांना सामोरी जाणारी, अग्रगण्य शिक्षण संस्था आहे- डॉ. मिलिंद निकुंभ

β : नाशिक :⇔ गोखले शिक्षण संस्था ही नव्या आव्हानांना सामोरी जाणारी, अग्रगण्य शिक्षण संस्था आहे-डॉ. मिलिंद निकुंभ - (प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे-गिरी )
β : नाशिक :⇔ गोखले शिक्षण संस्था ही नव्या आव्हानांना सामोरी जाणारी, अग्रगण्य शिक्षण संस्था आहे-डॉ. मिलिंद निकुंभ – (प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे-गिरी )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  सोमवार  : दि, 19 फेब्रुवारी 2024

β⇔ नाशिक, दि.19 (प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे-गिरी ):-“गोखले शिक्षण संस्था ही नव्या आव्हानांना सामोरी जाणारी, अग्रगण्य शिक्षण संस्था आहे ” असे प्रतिपादन डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले. ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. आपल्या मनोगतात त्यांनी संस्थेला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या संस्थेचा संपूर्ण भारतात विस्तार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समारंभाचे विशेष अतिथी सुधीर मुतालिक यांनी  शुभेच्छा देताना सांगितले की, व्यवस्थापन क्षेत्रातील पाठ्यक्रम सुरू करणे हे गोखले एज्युकेशन सोसायटीचे अत्यंत महत्वाचे कार्य आहे. प्रगतीचा वेग गाठण्यासाठी आज आत्मनिर्भर अर्थव्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सक्षम विद्यार्थी घडविणे, हे आजच्या शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे.गोखले एज्युकेशन संस्थेमध्ये समाज परिवर्तन करण्याची क्षमता आहे.  ललित बूब ह्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताकडे आज विकसशील अर्थ व्यवस्था असणारा देश म्हणून अपेक्षेने पाहिले जात आहे. औद्योगिक क्षेत्र व शिक्षण संस्था ह्यांच्यामध्ये समन्वय असणे ही आधुनिक काळाची गरज आहे, असे ते म्हणाले .
              ह्या प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रिं. एस. बी. पंडित ह्यांच्या स्नूषा सौ. तेजस्विनी पंडित ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ह्या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी आरोग्य विज्ञान विद्पीठाचे प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, विशेष अतिथी आयमाचे अध्यक्ष ललित बूब, सी आय आय चे अध्यक्ष  सुधीर मुतालिक , संस्थेच्या सचिव व खजीनदार डॉ. दीप्ती देशपांडे संस्थेचे प्रेसिडेंट डॉ आर.पी.देशपांडे, संस्थेचे चेअरमन डॉ. सुहासिनी संत, विभागीय सचिव प्रा. डॉ. राम कुलकर्णी, स्टाफ ट्रेनिंग ॲकेडमीच्या प्रमुख डॉ. अंजली कुलकर्णी आस्थापना संचालक शैलेश गोसावी , प्रकल्प संचालक प्राचार्य प्रदीप देशपांडे, बी.वाय.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन. सूर्यवंशी उपस्थित होते. संस्थेच्या सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

             संस्थेच्या नाशिक विभागाचे सचिव प्रा. डॉ. राम कुलकर्णी ह्यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रमुख अतिथींचा परिचय स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली. ह्या प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. एस. बी. पंडित ह्यांनी लिहिलेल्या आनंदयात्री, दोन थेंब अश्रुंचे ‘ ह्या पुस्तकांचे तसेच संस्थेच्या स्वयंप्रकाश व स्वयंप्रेरणा ह्या संशोधनपर नियतकालिकांच्या अंकांचे तसेच संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयाचे ‘ स्प्रेक्ट्रम ‘ ह्या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांनी संस्थेचे दोन मुख्य आधारस्तंभ दिवंगत माजी अध्यक्ष प्रिं एस . बी. पंडित, माजी सचिव दिवंगत सर डॉ मो. स. गोसावी ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली . संस्थेची विस्तारित होत जाणारी कार्यकक्षा स्पष्ट केली संस्थेच्या भावी काळातील योजना स्पष्ट केल्या. त्या म्हणाल्या शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाचा गोखले एज्युकेशन सोसायटीचा मोठा सहभाग असेल.
          ह्या प्रसंगी सुशीला यादव, मच्छिंद्र वाकचौरै, डॉ. प्रशांत पिंगळे, रवींद्र राजवाडे,  राहूल बने, ह्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले.उत्कृष्ट कर्मचारी म्हणून साक्षी सुर्वे, दत्तू चव्हाण यांना गौरविण्यात आले. संस्थेच्या नाशिक रोड महाविद्यालयाला बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त झाला. महाविद्यालयाच्या फार्मसी महाविद्यालयाच्या स्पेक्ट्रम ह्या वार्षिक अंकाला उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार मिळाला. प्राचार्या मृणाल देशपांडे यांना बेस्ट टीचर आत्रप्रेनर पुरस्कार प्राप्त झाला. प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर ,  विकास जोशी , प्रा. रावसाहेब घेगडे, प्राचार्य डॉ.मंजूषा कुलकर्णी, डॉ. लीना भट, प्राचार्य डॉ. राकेश जाधव, डॉ. बोरस्ते ह्यांना पेंटट प्राप्त केल्या बद्दल गौरविण्यात आले.
ह्या प्रसंगी पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांना गौरविण्यात आले. 
               कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी. वाय. के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी ह्यांनी मान्यवरांप्रती आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुग्धा जोशी व डॉ स्नेहा रत्नपारखी ह्यांनी सूत्रसंचालन केले. ह्या कार्यकमाला संस्थेच्या नाशिक, मुंबई , पालघर , विभागातील प्राचार्य , उपप्राचार्य , मुख्याधापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो. 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!