





शिक्षकेतर कर्मचारी श्री गजानन बैरागी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
β⇔ “दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि 21 ऑक्टोबर 2023
β⇔निफाड ( सायखेडा ) ,ता.21 ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :- निवृत्ती म्हणजे आयुष्याची दुसरी इनिंग असते , अखंडपणे सेवा करत लाखो विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणे ही खरी निवृत्ती असते. काम कोणतेही असो समाजाच्या ञडणघडणीत शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्थान महत्वाचे असते, असे मत मराठा विद्या प्रसारक निफाड तालुका संचालक शिवाजी आप्पा गडाख यांनी केले. ते जनता इंग्लिश स्कूल सायखेडा येथे शिक्षकेतर कर्मचारी गजानन मोहनदास बैरागी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.31 ऑक्टोबर रोजी ते 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून ते सेवानिवृत्त होत आहे .त्यानिमित्त शिक्षकेतर कर्मचारी श्री बैरागी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

β : निफाड :⇔ शिक्षकेतर कर्मचारी श्री गजानन बैरागी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
यावेळी या कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष विजय कारे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकांताचार्य महाराज, ग्रामपालिका सदस्य अश्फाक शेख प्राचार्य नवनाथ निकम , उपप्राचार्य शरद शेळके, पर्यवेक्षक दौलत शिंदे, त्यांच्या आई श्रीमती वत्सलाबाई बैरागी, संजय बैरागी ,रमेश बैरागी ,बंडोदास बैरागी, नलिनी बैरागी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नवनाथ निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत आभारे यांनी केले. यावेळी बैरागी यांनी अकरा हजार रुपयांचा चेक संस्थेसाठी देणगी स्वरूपात संचालक शिवाजी आप्पा गडाख यांच्याकडे सुपूर्द केला . विद्यालयासाठी दोन सफेद बोर्ड दिले यावेळी हर्षल बैरागी अश्फाक शेख विजय कारे यांची भाषणे झाले प्रारंभी गीत मंच व संगीत शिक्षक ज्ञानेश्वर करपे यांनी इशस्तवन सादर केले.कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व स्वकीय आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक दौलत शिंदे यांनी मांडले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
