





जोरणच्या सरपंचाला अटक: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 20 ऑक्टोबर 2024
β⇔वणी(नाशिक), ता.20 (प्रतिनिधी : सुरेश सुराशे):- दिंडोरी तालुक्यातील जोरण गावात सरपंच पदावर असलेल्या मंगेश लोखंडे (२८) याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी घरी एकटी होती. सरपंच लोखंडे पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरी घुसून तिचा विनयभंग केला. मुलीने लगेचच आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली, त्यानंतर तिच्या पालकांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
विशेष म्हणजे, मंगेश लोखंडेची जोरण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड 23 सप्टेंबर 2024 रोजी, म्हणजेच एक महिन्यापूर्वीच झाली होती. मात्र, अल्पावधीतच त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून अशा गंभीर गुन्ह्याचा प्रकार घडवला. या घटनेमुळे जोरण परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
हे पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही या सरपंचावर एका महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल असल्याची गावात चर्चा सुरू आहे. अल्पवयीन मुलीच्या बाबतीत झालेल्या या घटनेनंतर, सरपंचाच्या कृत्याबाबत अधिक चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या गंभीर घटनेमुळे जोरण गावात लोकांमध्ये रोष पसरला असून, सरपंचाच्या पदाचा असा गैरवापर होण्याच्या घटनेमुळे प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510