





प्रबोधन विदयालय आंबाठा येथे “ शिक्षक दिन “ उत्साहात साजरा !
β⇒ दिव्य भारत बीएसएम वृत्तसेवा : नाशिक :गुरुवार : दि. ७सप्टेंबर २०२३
β⇒ सुरगाणा , ता. ७( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ) :- ५ सप्टेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये ” शिक्षक दिन “ साजरा केला जातो . शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी सोशल वेल्फेअर सेंटर सोसायटी मुंबई संचलित प्रबोधन विद्यालय अंबाठा (ता. सुरगाणा ) या विद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व नृत्याने करण्यात आली. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिस्टर सिलिंन ह्या होत्या. अध्यक्ष व मुख्याध्यापक सिस्टर थेरेसा व सर्व शिक्षकांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले.
यावेळेस विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला तसेच संस्थेच्या वतीने केक कापून “शिक्षक दिन” साजरा करण्यात आला. शिक्षकांचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.अनेक विद्यार्थी शिक्षक बनून त्यांनी शिकविण्याचा अनुभव घेतला. यावेळेस विद्यार्थ्यांमधून इयत्ता दहावीचा विद्यार्थी भूषण गायकवाड यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली . विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कु. जयश्री गवळी आणि कु. हर्षाली महाकाळ यांनी गुरुजनांच्या सन्मानार्थ कविता आणि भाषण सादर केले. फादर प्रफुल्ल यांनी शिक्षक दिनाविषयी पडद्यावर पीपीटी सादर केली. यावेळेस शिक्षकांचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सिस्टर थेरेसा व फादर प्रफुल्ल यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंकिता टोपले व कुमार आकाश गांगोडे यांनी केले. यावेळेस सिस्टर एलिसा, ब्रदर विकी रोशन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
